-महापौर जयवंत सुतार यांची उपस्थिती.
नवी मुंबई : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान आणि महाराष्ट्र शासनातर्ङ्गे काल २ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान आयोजित केले होते. त्याच अनुषंगाने नवी मुंबईतही नेरुळ, कोपरखैरणे, ऐरोली विभागामध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले होते. या शिबीरात एकुण ३८५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. महाराष्ट्रात रक्ताची मोठी चणचण निर्माण झाली असून या शिबीरामुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास मोठी मदत होणार आहे. संस्थानाने संपूर्ण महाराष्ट्रात जगद्गुरुश्रींच्या जन्मोत्सवानिमित्त ३५० कॅम्पचे नियोजन करण्यात आले होते. २६,५४० रक्त संकलीत करुन, गरजूंसाठी शासनाला देण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी स्वर्गीय मॉंसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय, नेरुळ येथे नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. त्या प्रसंगी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, बेलापूर विधानसभा उपाध्यक्ष जयेंद्र सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. कोपरखैरणे विभागात झालेल्या कार्यक्रमात नगरसेविका सुवर्णाताई पाटील, नगरसेविका कमलताई पाटील तसेच दिघा आनंदनगर येथील कार्यक्रमाला माजी नगरसेवक अनंत महादूशेठ ठाकूर अनेक मान्यवरांनी भेट दिली.
त्याच प्रमाणे उपपीठाचे व्यवस्थापक व जिल्हा सेवा समितीचे प्रभारी अध्यक्ष संदीप म्हात्रे, निरिक्षक उत्तम तांडेल, महिलाध्यक्षा मिनाक्षीताई हिलाल, जिल्हा कमांडर तुकाराम चव्हाण, जिल्हा युवा अध्यक्ष शुभम् ढवळे व जिल्हा सचिव नंदकुमार आदक यांच्या समवेत सर्व जिल्हा सेवा समितीने शिबीरासाठी चांगल्या प्रकारे सहकार्य केले.