ठाणे : ठाण्यात स्थानिक वृत्तवाहिनी संचालक म्हणून ठाण्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेले जेष्ठ स्थानिक वृत्तवाहिनी संपादक आणि अनेक कॆमेरामॅन, पत्रकारांच्या कार्यशाळाचे संचालक असलेले श्रीराम भिडे मास्तर यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.
स्थानिक वृत्तवाहिनी सुरु करण्याचा दुसरा मान पटकाविणारे स्वर्गीय भिडे मास्तर हे गेल्या २५ वर्षांपासून जास्त काळ स्थानिक वृत्तवाहिनी संचालक म्हणू कार्यरत होते. ठाण्यात स्थानिक वृत्तवाहिनी “ठाणे समाचार” हि सुरु करून दुसरा क्रमांक मिळवला होता. ठाणे समाचार या वृत्तवाहिनीतून अनेक कॆमेरामॅन आणि पत्रकाराची निर्मिती भिडे मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कालांतराने त्यांनी “ठाणे परिक्रमा” नावाची स्थानिक वृत्तवाहिनी सुरु केली. आज मोठ्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या कॆमेरामॅन किंवा पत्रकार म्हणून वावरणाऱ्या पत्रकारांचे :ठाणे समाचार” हे उगमस्थान होते. तर या निर्मितीच्या कार्यशाळेचे संचालक स्वर्गीय भिडे मास्तर होते. सोमवारी त्यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाल्याने वृत्तपत्र आणि स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिव देहावर सोमवारी संध्याकाळी माजिवडा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पत्रकार मित्र, सहकारी आणि शिष्याच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्यात आले.