नवी मुंबई : नेरूळ सेक्टर चारमधील अर्ंतगत भागातील रस्त्यावर बंद पडलेले पथदीप आणि नाल्याची दुरावस्था या समस्येवर आक्रमक होत भाजपचे स्थानिक वॉर्ड अध्यक्ष विलास चव्हाण यांनी पालिका नेरूळ विभाग अधिकार्यांकडे लेखी निवेदनातून लवकरात लवकर या समस्यांचे निवारण करण्याची मागणी केली आहे.
नेरूळ सेक्टर चारमधील नेबरहूड शॉपगि सेंटरलगत नवीन बनविलेल्या नाल्याची दुरावस्था झाल्याचे भाजपचे विलास चव्हाण यांनी निवेदनातून पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. नाल्याच्या दुरूस्तीचे काम बेजबाबदारपणे करण्यात आले असून कामाचा दर्जाही निकृष्ठ दर्जाचा आहे. नाल्यावरील झाकणे फ्रेमसहीत तुटलेली आहेत. रात्रीच्या वेळी अंधारात या तुटलेल्या झाकणात स्थानिक रहीवाशांचा पाय अडकून गंभीर दुखापत होण्याची भीती भाजपचे विलास चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. नाल्याचे काम करणार्या ठेकेदाराकडून काम व्यवस्थित करून घेण्यात यावे, तसेच कामाचे देयक दिले नसल्यास तर देवू नये आणि संबंधित काम ७ दिवसाच्या आत पूर्ण करून घेण्याची मागणी भाजपच्या विलास चव्हाण यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर चारमध्ये महापालिका विभाग कार्यालयानजिक न्यु हेवन सोसायटी आणि नेबरहूड शॉपिंग सेंटरमधील रस्त्यावरील पथदीवे गेल्या काही महिन्यापासून बंद आहेत. रस्त्यावर केवळ वीजेचे खांब असून त्यावरील दीवे बंद आहे. पथदीप बंद असल्याने स्थानिक रहीवाशांना रात्रीच्या वेळी अंधारातच ये-जा करावी लागत आहे. समस्येचे गांभीर्य पाहता लवकरात लवकर समस्येचे निवारण करण्याची मागणी भाजपचे विलास चव्हाण यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. निवेदनासोबत समस्येची सत्यता पटवून देण्यासाठी भाजपच्या विलास चव्हाण यांनी छायाचित्रेही जोडली आहेत.