प्रा. अशोक बागवे खुलवणार मुलाखत
पनवेल : सीआयडी मालिकेसह विविध हिंदी आणि मराठी सिनेमात आपल्या कलेचा आविष्कार फुलवणारे ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम येत्या शनिवारी (दि. 03) कळंबोलीतील न्यू इंग्लिश सुधागड हायस्कूलमध्ये येत आहेत. दुपारी 5 वाजता एका प्रकट मुलाखतीमधून ते त्यांच्या चाहत्यांसह नागरिकांना अनुभवायला मिळतील. ज्येष्ठ कविवर्य प्रा. अशोक बागवे हे त्यांची मुलाखत घेणार आहेत.
निमित्त आहे, ‘सत्याची चाड आणि अन्यायाची चीड’ हे ब्रीदवाक्य घेवून समाजप्रबोधनाचा यज्ञ मांडलेल्या दै. निर्भीड लेखच्या यंदाच्या 22 व्या पर्यावरण विशेष दिवाळी अंकांच्या प्रकाशन समारंभाचे. साटम यांच्या हस्ते प्रकाशन होईल.
माजी आमदार विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार्या कार्यक्रमात पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची उपस्थितीही आकर्षण ठरणार आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतिशशेठ पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नारायणशेठ ठाकूर, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील, जिल्हाध्यक्ष शिरीष घरत, शेकापचे जिल्हा चिटणीस गणेश कडू, राष्ट्रवादीचे नेते दिलीपशेठ खानावकर, विजय खानावकर, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. भक्तीकुमार दवे, भीमसेन माळी, ऍड. गजानन माळी, रमणीकशेठ माखेजा, शिवसेनेचे महानगर प्रमुख रामदास शेवाळे, पर्यावरण शेलचे महाराष्ट्र कॉँग्रेस प्रमुख अशोक मोरे, अशोक मुंडे, पनवेल शहर कॉँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील, तालुकाध्यक्ष महादेव कटेकर, राष्ट्रवादीचे नेते महादेवशेठ पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, शिवसेना उपजिल्हाध्यक्ष रामदास पाटील, समाजवादीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, कॉंग्रेसचे नेते बशिरभाई शेख, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य सुरदास गोवारी, नगरसेवक गोपाळ भगत, बबनशेठ मुकादम, रविशेठ भगत, शेकाप नेते शंकर म्हात्रे, कॉंग्रेसचे नेते अरविंद सावळेकर, माजी उपनगराध्यक्ष रमणीकशेठ माखेजा, पंचायत समितीचे माजी उपसभापती सखारामशेठ पाटील, कॉँग्रेस नेते शशिकांत बांदोडकर, द्वारकानाथ भगत, शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर, भाजपाचे नेते सुधाकरशेठ पाटील, शांताराम भगत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दिवाळी अंकात ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर, कांतीलाल कडू, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, सरोज गुंडप, सिंचनतंत्राचे अभ्यासक डॉ. दि. मा. मोरे, पर्यावरणतज्ञ जयेश जाधव, अविनाश सागरमित्र आदी विचारवंतांचे लेख आहेत.
सुधागड हायस्कूलच्या वातानुकूलित सभागृहात संपन्न होणारा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन दै. निर्भीड लेखचे संपादक कांतीलाल कडू यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनसेचे नवीन पनवेल शहर प्रमुख पराग बालड करणार आहेत.