मुंबई : शिवसेना राम मंदिर उभारणीसाठी हिंदी भाषिक मतदारांमध्ये राजकीय सहानभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण मनसेने मराठी मतावर आपली मोहर निर्माण करण्यासाठी मनसेने पुन्हा एकदा छट पुजेला विरोध केला आहे. मनसेच्या या विरोधाने उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिकामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे कार्यकर्ते छट पुजेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. पण मनसेच्या आक्रमकतेचे परिणाम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राम मंदिर उभारणी करण्यात येणाऱ्या चलो अयोध्या कार्यक्रमात निर्माण अडचणी निर्माण करू शकतो. कारण हिंदी प्रदेशात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना ठाकरे कुटुंबातील एकत्रित सदस्य म्हणूनचं बघितले जाते. त्यामुळे मनसे हें छट पुजेला विरोध ऐन उद्धव ठाकरे यांच्या चलो अयोध्या कार्यक्रमावेळी जाणीव पूर्वक केल्याचं राजकीय वर्तुळात बोलले जात आहे
छट पुजा १३ नोव्हेंबरला होणार आहे. या छट पुजेला विरोध करण्यासाठी मनसेने ठाणे महापालिका आयुक्त आणि प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे तक्रार केली आहे. प्रदूषण नियंत्रण बोर्डाने छट पुजेवेळी जे निर्माल्य तलाव परिसरात तसेच टाकले जाते. त्या छट पुजा आयोजकावर कारवाई करावी असे आदेश दिल्याचे मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले आहे. त्यामुळे मनसेने ठाणे महापालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे की गणेशोत्सवात निर्माल्य नेण्यास बंदी असते तशी बंदी छट पुजे दरम्यान करावी. नाही तर या छट पुजा आयोजकांना कृत्रिम तलाव निर्माण करुन त्यांना तिथे छट पुजा करण्यास सांगावे अशी सूचना मनसे कार्यकर्ते पुष्कर विचारे यांनी मनसेमार्फत केली आहे.
छटपुजेच्या आधीच ठाण्यात वातावरण तापले आहे. मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिका आयुक्त इशारा देत मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल असे स्पष्ट केले आहे. ठाणे मनसेच्या इशाऱ्यांने राजकीय लढाईत मनसेला मराठी व्होट बँकचा पुन्हा एकदा जवळ करण्यात फायदा होईल का ? हे आगामी दिवसात पहावे लागेल.