नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १६, १६ए, १८ व पामबीच मार्ग सर्व्हिस रोडची सुरक्षा व्यवस्था केवळ पोलिसांच्या परवानगीमुळे असुरक्षित बनली असल्याचा सूर आता स्थानिक रहीवाशांकडून आळविला जावू लागला आहे.
२०१५ साली झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर प्रभाग ९६ मध्ये राजकीय उलथापालथ झाली. शिवसेनेचा बालेकिल्ला, शिवसेना शहरप्रमुखांचे निवासी वास्तव्य आणि गेली १० वर्षे ज्या ठिकाणाहून शिवसेनेचा नगरसेवक निवडून येत होता, त्या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुसंडी मारली आणि सौ. रूपाली किसमत भगत या नगरसेविका म्हणून येथून निवडून आल्या.
हा परिसर पूर्णपणे सिडको वसाहतींचा परिसर असून जवळपास ४० पेक्षा अधिक सिडकोच्या या ठिकाणी गृहनिर्मांण सोसायट्या असून पामबीच सर्व्हिस रोडचाही या प्रभागात समावेश होत आहे. जवळपास ३० ते ३२ हजार लोकसंख्या असलेल्या या परिसरातील कायदा व सुव्यवस्थेला २०१५ पासून राष्ट्रवादी कॉंग्र्रेसच्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी प्राधान्य देत महापालिका प्रशासन आणि नेरूळ पोलीस स्टेशन ते नवी मुंबई पोलिस आयुक्तालयापर्यत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
२०१५ पासून महासभा तसेच महापालिका अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी प्रभागातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, चांगा ठाकूर चौक या दोन महत्वाच्या चौकात, रस्त्यावर, अंर्तगत रस्त्यावर, पामबीच सर्व्हिस रोड या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत म्हणून पालिका प्रशासन दरबारी पाठपुरावा केला आहे. या परिसरात सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव महापालिका सभागृहात महासभेदरम्यान संमतही झालेला आहे. केवळ पोलिस आयुक्तालयाकडून या प्रस्तावास परवानगी मिळण्याचीच परिसरातील जनता व स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली किसमत वाट पाहत आहे. या परवानगीसाठी सातत्याने त्यांनी पोलिस आयुक्तांलयाचे उंबरे झिजविले आहे.
प्रभागात असणाऱ्या पामबीच मार्गालगतच्या सर्व्हिस रोड सकाळी, संध्याकाळी व रात्री नेरूळ नोडमधील रहीवाशी निरोगी राहण्यासाठी व प्रकृती स्वास्थाकरिता शुध्द हवा मिळावी म्हणून हजारोच्या संख्येने पायी चालतात. पहाटे मॉर्निग वॉक करणाऱ्या व रात्री पाय मोकळे करण्यासाठी जेवणानंतर फिरावयास येणाऱ्या रहीवाशांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी पोलिस चौकी उभारण्यात यावी यासाठीही स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी महापालिका, नेरूळ पोलिस स्टेशन व पोलिस आयुक्तालय आदी ठिकाणी गेल्या तीन वर्षात सतत पाठपुरावा केला आहे. पामबीच सर्व्हिस रोड चेनस्नॅचिंगच्या घटनाही घडल्या आहेत.
पोलिसांकडून परवानगीचा विलंब होत असल्यामुळे स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतरही परिसरात सीसीटीव्ही बसण्यास तसेच पोलिस चौकी निर्माण होण्यास विलंब होत असल्याची नाराजी स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केली जात असून मोठी दुर्घटना झाल्यावरच पोलिसांचे परवानगीसाठी डोळे उघडणार काय, असा संताप स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केला जात आहे.