नवी मुंबई : दुबई येथील ‘आशियाई बेंचप्रेस स्पर्धे’त 120 किलोहून अधिक वजनी गटात महेश रघुनाथ रासकर या 21 वर्षीय नवी मुंबईकर वेटलिफ्टर क्रीडापट्टूने ‘रौप्य’ पदक संपादन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी मुंबईचा नावलौकीक उंचाविल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिका सर्वसाधारण सभेत महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते त्यांना सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त (शहर) रविंद्र पाटील, स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, सभागृह नेता रविंद्र इथापे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती मुनवर पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ, शिवसेना पक्ष प्रतोद श्री. व्दारकानाथ भोईर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नगरसेविका-सभापती श्रीम. अंजली वाळुंज, नगरसेवक गिरीश म्हात्रे, नगरसेविका श्रीम.दयावती शेवाळे आदी उपस्थित होते.