नवी मुंबई : प्रभागामधील अविकसित भुखंड आणि डेब्रिज उचलण्यात होणारा, स्वच्छतेबाबतचा कामचुकारपणा विलंब यामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनाला धारेवर धरत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी प्रभागातील समस्यांचा पंचनामा मांडत पालिका अधिकाऱ्यांना प्रभाग समितीच्या बैठकीत खडे बोल सुनावले आहेत.
उच्चशिक्षित असणाऱ्या सौ. सुजाताताई पाटील या महापालिका सभागृहात प्रभाग ८५चे प्रतिनिधीत्व करतात. या प्र्रभागात कुकशेत व सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसराचा समावेश होत आहे. सौ. सुजाताताई पाटील या वाणिज्य शाखेच्या द्विपदवीधर असून, मितभाषी असणाऱ्या सौ. सुजाताताई पाटील यांची कामे, पाठपुरावा, सुविधांची उपलब्धता आणि कामे न झाल्यावर प्रशासनाच्या बैठकीत होणारा उद्रेक मात्र बोलका असतो. महासभेदरम्यान अथवा प्र्रभाग समितीच्या बैठकीत केवळ आपल्या उपस्थितीतून अस्तित्व न दाखविता प्र्रभागातील समस्या व सुविधा हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो. नेरूळ सेक्टर सहाच्या जनसंपर्क कार्यालयातून आपल्या निवासस्थानी जाताना त्या नेरूळ सेक्टर सहा, सारसोळे गाव व कुकशेत गाव अशी पायपीटच करत जातात. त्यावेळी समस्यांची पाहणी करून दुसऱ्याच दिवशी त्या समस्या निवारणासाठी पाठपुरावा सुरू होतो.
बुधवारी झालेल्या प्रभाग समितीच्या बैठकीत सारसोळे गावातील मासळी मार्केटची अस्वच्छता, साररसोळे गावातील महापालिका शाळेमागे पडणारे डेब्रिज, कुकशेत गावातील अविकसित भुखंडाची सफाई यावरून सभापती सौ. सुजाताताई पाटील यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. सारसोळे गावातील मासळी मार्केटमधील दोन वेळा कचरा हटवून तेथे विशेष स्वच्छता ठेवण्याचे निर्देश सभापती सुजाता पाटील यांनी दिले. दुपारी मार्केट बंद झाल्यावर व रात्रीच्या वेळी तेथील कचरा व अस्वच्छता हटविण्याची मागणी त्यांनी या बैठकीत पालिका प्रशासनाकडे केली. सभोवतालच्या लोकांना दुर्गधीचा त्रास होत असून त्यांच्या आरोग्याला धोका पोहोचता कामा नये असे खडे बोल त्यांनी बैठकीत सुनावले.
सारसोळेतील महापालिका शाळेमागे असलेल्या डेब्र्रिजमुळे शालेय वास्तूला व परिसराला बकालपणा येत असून ग्र्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तेथील डेब्र्रिज हटवून परिसर सुशोभित करावा. याशिवाय कुकशेत गावातील रिक्त भुखंडावर डेब्रिजचे डोंगर निर्माण झाले असून जंगली झुडूपेही वाढली आहे. शहरात स्वच्छता अभियान राबविले जात असून हे भुखंड मात्र बकालपणाच्या विळख्यात आजही आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या भुखंडाची सफाई करण्याची मागणी सभापती सौ. सुजाताताई पाटील यांनी बैठकीत केली.