नवी मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयात ॲम्फीथिेएटर येथे प्रतिमापूजन संपन्न झाले. याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार, उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, माजी महापौर तथा नगरसेवक श्री. सुधाकर सोनवणे, अतिरिक्त आयुक्त श्री. महावीर पेंढारी, फ प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. अनिता मानवतकर, नगरसेवक श्री. नामदेव भगत, श्री. निवृत्ती जगताप, श्री. राजेश शिंदे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. किरणराज यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, मुख्य लेखा परीक्षक श्री. दयानंद निमकर, उपआयुक्त श्री. अमोल यादव, श्री.तुषार पवार, श्री. दादासाहेब चाबुकस्वार, श्री. नितीन काळे, शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, शिक्षणाधिकारी श्री. संदीप संगवे, इटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके, सहा. आयुक्त श्री. प्रकाश वाघमारे, कनिष्ठ विधी अधिकारी श्री. अभय जाधव आणि इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर येथे अभिवादन करण्यासाठी नवी मुंबईतून पुढे जाणा-या नागरिकांकरीता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सी.बी.डी. बेलापूर येथील उड्डाणपुलाखाली सायन पनवेल महामार्गावर सुविधा कक्ष उभारून त्याठिकाणी चहापान व्यवस्था करण्यात आली होती. याठिकाणीही महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते, उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, माजी महापौर तथा नगरसेवक श्री. सुधाकर सोनवणे, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, श्री. अशोक गुरखे, श्रीम. सुरेखा नरबागे, उपआयुक्त श्री. अमोल यादव व श्री. दादासाहेब चाबुकस्वार, सहा. आयुक्त श्री. चंद्रकांत तायडे, बेलापूर विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. चैत्यभूमीकडे अभिवादन करण्यासाठी नवी मुंबईतून पुढे जाणा-या नागरिकांनी मोठ्या संख्येने या सुविधा कक्षाला भेट दिली.
अशाच प्रकारची व्यवस्था सेक्टर 15 ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ठिकाणीही करण्यात आली होती. त्याठिकाणीही महापौर श्री. जयवंत सुतार यांनी उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, माजी महापौर तथा नगरसेवक श्री. सुधाकर सोनवणे, जी प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. नंदा काटे, फ प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. अनिता मानवतकर, नगरसेवक श्री. संजू वाडे, उपआयुक्त श्री. अमोल यादव, ऐरोली सहा. आयुक्त श्री. अनंत जाधव, माजी नगरसेवक श्री. अशोक पाटील यांच्यासह भेट दिली व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.