सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : स्वच्छ नवी मुंबई व सुंदर नवी मुंबई हा नारा आपल्या प्रभागात प्रत्यक्षात आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रभाग ९६ मधील नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत सातत्याने प्रयत्न करत असतात. सोसायटी आवारात कचरा कोठे पडू नये व रहीवाशांनी ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करूनच कचरा द्यावा तसेच आपल्या कचराकुंड्या सोसायटीच्या प्रवेशद्वारावर ठेवून अथवा पदपथावर ठेवून परिसराला बकालपणा आणू नये म्हणून नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत या सतत घरटी जनसंपर्क करत लोकांशी सुसंवादातून मार्गदर्शन करत असतात.
प्रभागातील गृहनिर्माण सोसायटींच्या मागणीनुसार स्थानिक नगरसेविका सौ.रुपाली किस्मत भगत यांनी वारंवार महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून आज नेरुळ प्रभाग क्रमांक -९६ मधील गृहनिर्माण सोसायटींना महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून कचऱ्याचे डब्बे वाटप करण्यात आले. संबंधित कचराकुंड्या मध्ये आपला ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून टाकावा. घर ,सोसायटी आणि परिसर स्वच्छ ठेवल्यास कोठेही बकालपणा आढळून येणार नाही, कचराकुंड्या आपण सोसायटी आवारातच ठेवाव्यात त्या पदपथावर अथवा सोसायटीच्या बाहेर ठेवून परिसराला बकालपणा येणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन नगरसेविका रुपाली किस्मत भगत यांनी सोसायटी पदाधिकारी आणि सदस्यांना केले
कचऱ्याचे डब्बे वाटप करताना नेरुळ पश्चिम तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत,राजेंद्र धनावडे आनंद पवार,चंद्रकांत महाजन,रमेश नार्वेकर,गोरक्षनाथ गांडाल,शांताराम गांडाल,असिफ शेख,विकास तिकोने,रवींद्र भगत व प्रभागातील सोसायटी पदाधिकारी उपस्थित होते.