गणेश नवघरे
खेड : खेड तालुक्यातील खोंडे-कातळवाडी येथे दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घराला आग लागल्याची घटना घडली यामध्ये घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.यामध्ये २८ लाखांचे नुकसान झाले असल्याचे समजते.
याबाबतीत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार खोंडे-कातळवाडी मधील सतीश शंकर निकम यांच्या घरामध्ये सतीश निकम यांची तीन मुले प्रकाश,चैतन्य,अभिजित त्यांची पत्नी वैशाली व भाडेकरू साक्षी सुहास घरवी होते आज दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास सर्व मंडळी झोपली असताना अचानकपणे घराला मोठ्या प्रमाणात आग लागली ही आग लागल्याचे सतीश यांचा मुलगा चैतन्य याच्या लक्षात येताच त्यांनी शेजारी आजूबाजूला असलेल्या माणसांना सांगितले त्यावेळी शेजारी अक्षय बैकर,इंद्रजित पवार,साहिल पवार व अन्य यांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठ्या प्रमाणात भडकत होती याची खबर मदत ग्रुपचे प्रसाद गांधी,रेस्क्यू टीमचे बुरांन टांके यांना समजताच त्यांनी घटनास्थळी येऊन तात्काळ खेड अग्निशामक केंद्राला संपर्क करून बंब मागविला व त्यांच्या साहाय्याने व स्थानिकांच्या साहाय्याने मदत ग्रुपचे सदस्य अक्षय भोसले,बैकर,रेस्क्यू टीमचे विवेक बनकर,नंदेश खेडेकर आदींनी अग्निशामक बंबाच्या मदतीने आग दीड तासात आग विझवण्यात यश आले.या घटनेमध्ये ७० मन भात, इतर धान्य,कागदपत्रे,२ टीव्ही,१ फ्रीज अन्य इलेकंट्रोनिक्स उपकरणे,कपडे,भांडी,लाकडी समान जाळून खाक झाले.ही आग कशामुळे लागली ते अद्याप समजले नाही.या घटनेची खबर मिळताच खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर,नगरसेवक अजय माने,विश्वास मुधोले, युवा सेने राज्यकार्यकरिणी सदस्य योगेशदादा कदम, जि.प.सदस्य आणा कदम,सभापती अपर्णा नक्षे,प.स.सदस्य गणेश मोरे,आदी व खेड पोलीस निरीक्षक गंभीर साहेब,पीएसआय म्हस्के,पो हे.कॉ.कदम,पेंढाम्बकर,खोपटकर व सर्कल मिरगावकर,तलाठी उतेकर व त्यांचे सहकारी व महावितरणचे अधिकारी दाखल झाले.घटनेची सर्व पाहणी करून तलाठी व सर्कल यांनी पंचनामा करून २८ लाखाचे नुकसान झाले असल्याचे सांगितले.या घटनेतील पीडित पाच कुटुंबाला शिवसेनेच्या वतीने तातडीची मदत म्हणून प्रत्येकी ५ हजार रुपये व १० दिवसांच्या जेवणाचे धान्य युवासेनेचे राज्यकरिणी सदस्य योगेशदादा कदम,आण्णा कदम यांच्या हस्ते देण्यात आले व शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले.