सुजित शिंदे
नवी मुंबई : नवी मुंबईतील नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपिठ मिळवून देण्यासाठी मोफत मार्गदर्शन या तत्वावर नेरूळ भाजपच्या वतीने अभिनयाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. १५ डिसेंबरपासून या कार्यशाळेस सुरूवात होणार असून नेरूळ सेक्टर आठमधील एल मार्केटमधील पहिला मजला ऑफिस क्रं १२ लिटिल चॅम्प प्रिस्कूल येथे ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. शनिवारी सांयकाळी ५ ते ७.३० आणि रविवारी सांयकाळी ४.३० ते ७.३० या वेळेतही कार्यशाळा होणार आहे.
या कार्यशाळेत प्रमोद सुर्वे, रोनित पंगेरकर, मिनाक्षी साहित्य, दक्षिणा गलांडे हे अभिनयावर तर रूपाली पवार, सागर कबाडी हे नृत्यावर या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. वॉर्ड ८४ चे भाजप अध्यक्ष विलास चव्हाण, वॉर्ड ९४चे अध्यक्ष अमर पाटील, नेरूळ पूर्वचे महामंत्री गिरीराज दरेकर हे या कार्यशाळेचे आयोजक असून या कार्यशाळेत नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विलास चव्हाण यांनी केले आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ९६१९६६५४४९, ८१६९५५०३६० या क्रमांकावर संपर्क साधावा.