स्वयंम न्यूज ब्युरो
नवी मुंबई : महापालिकेच्या प्र्रभाग समितीमध्ये विषय मांडून तसेच महापालिकेमध्ये लेखी तक्रारी करूनही नेरूळ सेक्टर आठमधील अंबिका शॉपिंग कॉम्पलेक्समधील चायनीज चालकांनी व्यवसायानिमित्त केलेल्या अतिक्रमणाकडे महापालिका प्रशासन कानाडोळा करत आहे. प्र्रभाग समितीच्या बैठकीतही चायनीजचालकांच्या अतिक्रमणाबाबत वारंवार मुद्दा उपस्थित होवूनही ठोस कारवाई होत नसल्याने पालिका प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांचे व चायनीज व्यावसायिकांत ‘आर्थिक ओलावा’ असण्याचा संताप आता स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अंबिका शॉपिंग कॉम्पलेक्सच्या तळमजल्यासमोरील जागेत चायनीज चालकांनी गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण करून पालिका प्रशासनाला मॅनेज करून आपला व्यवसाय चालविला अहो. विशेष म्हणजे चायनीज चालकांच्या अतिक्रमणाबाबत वर्तमानपत्रात बातम्या येवून, पालिका प्रशासनाकडे लेखी तक्रारी करूनही, प्रभाग समिती सदस्यांनी लेखी तक्रार करत तसेच प्रभाग समितीच्या बैठकीत वारंवार मुद्दा उपस्थित करूनही या सर्व घडामोडीकडे कानाडोळा करत नवी मुंबई महापालिका प्रशासन चायनीज चालकांच्या अतिक्रमणावरील आपले प्र्रेम तसूभरही कमी करत नसल्याचा संताप आता नेरूळवासियांकडून उघडपणे व्यक्त केला जात आहे.
अंबिका शॉपिंग कॉम्पलेक्सच्या पहिल्या मजल्यावर विविध दवाखाने व रूग्णालये आहेत. यात प्रसुतीगृहाचाही समावेश आहे. गेल्या काही महिन्यापासून महापालिका प्र्रभाग समिती सदस्य मनोजज यशवंत मेहेर यांनी चायनीज चालकांच्या अतिक्रमणाबाबत पालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार करीत तसेच प्रभाग समितीच्या बैठकीत विषय उपस्थित करून या समस्येचे गांभीर्य पालिका प्र्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. नुकत्याच झालेल्या प्र्रभाग समितीच्या बैठकीत मनोज मेहेर यांनी चायनीज चालकांच्या अतिक्रमणाला पालिका प्रशासन खतपाणी घालत असून आमच्या पाठपुराव्याला केराची टोपली दाखवित असल्याचा संताप व्यक्त केला होता. अतिक्रमणाला साथ देवून पालिका प्रशासन कोणत्या प्रकारचे स्वच्छता अभियान राबवू पाहत असल्याचा प्रश्न विचारत जमिनीवर बसून कामकाजात सहभागी होण्याचा इशारा मनोज मेहेर यांनी देताच पालिका प्र्रशासनाने एक महिन्याच्या आत या समस्येचे ठोस निवारण करण्याचे स्पष्टीकरण प्र्रभाग समितीच्या बैठकीत दिले आहे. प्र्रभाग समितीच्या बैठकीला १० दिवसाचा कालावधी लोटला तरी चायनीच चालकांच्या अतिक्रमणाविरोधात पालिका प्र्रशासन नेहमीप्रमाणे गांधारीच्याच भूमिकेत असल्यामुळे चायनीज व्यावसायिकांचा आर्थिक ओलावा कारवाईच्या आड येत असल्याचा संशय नेरूळवासियांकडून व्यक्त केला जात आहे. चायनीज चालकांच्या अतिक्रमणावर ठोस कारवाई न झाल्यास मंत्रालयातच पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या विरोधात नगरविकास मंत्री व नगरविकास राज्यमंत्र्यांकडे तसेच पालकमंत्र्यांकडे लेखी तक्रार करणार असल्याचा इशारा मनोज मेहेर यांनी दिला आहे.