मुंबई : देशातील पहिले आणि सर्वाधिक पसंतीचे मनोरंजन उद्यान, इमॅजिकाने नववर्ष २०१९ चे स्वागत सर्वोत्तम मनोरंजन आणि साहस यांच्या मिलाफाने परिपूर्ण पॅकेजसह होईल याची जय्यत तयारी केली आहे. उद्यानातील रंजक राइड्स उत्तर रात्री उशिरापर्यंत सुरू सर्वांसाठी खुल्या राहतील, तर बॉलीवूडचा अव्वल क्रमांकाचा डीजे आणि रिमिक्स आर्टिस्ट डीजे सुकेतू याच्यासह उद्यानातील अन्य आकर्षणे ही येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यासाठी ही हाय डेसिबल उत्सवी रात्र ठरणार आहे. इमॅजिकातील हा नववर्ष स्वागताचा उत्सव हा सोमवार, ३१ डिसेंबरला सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल आणि अगदी मध्यरात्रीनंतरही सुरू राहणार आहे. त्यामुळे भारतात सर्वाधिक काळपर्यंत सुरू राहणारी ती न्यू इयर पार्टीही असेल. डीजे मंदार आणि क्वीन ऑफ मॅशप्स® २०१८चे विजेता डीजे डी शेल्झच्या राणीचा विजेता यांच्या पेशकशींमधून संध्याकाळची रंगत आणखीच वाढणार आहे.
सर्व वयोगटांसाठी साजेशी इमॅजिकामधील ती संपूर्ण संध्याकाळ ही मजेदार आणि उत्फुल्लित असेल याची पक्की खात्री आहे. सुर्य मावळतीला असताना संधीकाळात पाहुणे एकत्र जमतात त्या ठिकाणी रोषणाईने नटलेले इमॅजिका कॅसल एकूण भव्यदिव्येत मोठी भर ठरेल. शिवाय रोलर कोस्टर्स आणि त्यांच्या सभोवतालच्या थरारक आकर्षणांमुळे उत्साह दुणावतच जाईल. टर्नटेबल आपल्या काही सुपरहिट संगीताच्या स्पिनिंगसाठी डीजे सुकेतूचे हात फिरतील तेव्हा एकंदर वातावरणात आणखीच उत्साही धुंदी भरली जाईल. ही संगीतमय आणि अत्याधिक आनंददायी संध्याकाळ उत्तरोत्तर मध्यरात्रीपर्यंत सरकत जाईल आणि अपेक्षित नववर्षाचे स्वागत फटाक्यांची बहारदार आतषबाजी आणि ग्रॅँड इमॅजिका परेडद्वारे होईल.
विनाखंड अथक मनोरंजन हा उत्सवाचा आणखी एक पैलू आहे. पाहुण्यांना या पार्टीनंतर सुरक्षित तंबूतील मुक्कामाद्वारे रात्रीच्या चांदण्यात सह्याद्रीच्या भव्य घाटांचे दर्शन, मंद धुकाळलेल्या गारव्यात घेता येईल. शेकोटीची मंद आच आणि सांगितिक उत्साह सोबतीला असेलच. ज्यांना साहसी कृत्यापेक्षा अधिक ऐषाराम हवा आहे त्यांच्यासाठी थीम पार्क जवळ उजवीकडे स्थित नोव्होटेल इमॅजिकामध्ये रात्रीच्या मुक्कामाची अतिरिक्त सोय आहेच. या सर्व रमणीयता आणि भव्यतेसह इमॅजिकातील रेस्टॉरंट्समध्ये विविधांगी भोजन पर्यायांचा आस्वाददेखील आपली वाट पाहत आहे.
इमॅजिकामधील नवीन वर्ष स्वागताचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी उत्सुक, डीजे सुकेतु म्हणाले, “थीम पार्कमध्ये पेशकश हा खरोखरच एक असामान्य अनुभव आहे आणि मी त्याबद्दल खूप उत्सुकही आहे. इमॅजिका हे एक सुंदर डिझाइन केलेले थीम पार्क आहे आणि संध्याकाळच्या रोषणाईत हे संपूर्ण क्षेत्र किती सुंदर असेल याची कल्पनाही करवत नाही. काही नवीन ट्रॅक येणाऱ्या पाहुण्यांसाठी स्पिन करण्यासाठी मी खूप आतूर आहे आणि आपण एकत्रपणे नवीन वर्षाच्या स्वागताची मजा करू. शिवाय माझ्या प्रस्तुतीनंतर ‘डेअर 2 ड्रॉप’ आणि ‘डीप स्पेस’ राइड्सचा थरार मीही निश्चितपणे अनुभवणार आहे, हे वेगळे सांगायला नकोच.
उत्सवांविषयी बोलताना, इमॅजिकाचे एव्हीपी मार्केटिंग अँड स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, रवींद्र सिंग म्हणाले, “इमॅजिकामध्ये आम्ही मजेदार उपक्रम आणि येणाऱ्या प्रत्येकासाठी आकर्षण ठरेल अशा चांगल्या अनुभूतीचे वचन देतो. उत्कृष्ट शो सादर करणाऱ्या मनोरंजन उद्योगातील सर्वोत्कृष्ट कलाकारांसह सोयीस्कर आणि उत्साही राहण्याच्या आणि अतिथींसाठी विभिन्न ढंगाच्या भोजन पर्यायांसह, आम्हाला सांगण्यास अत्यंत अभिमान वाटतो की साल दरसाल आमच्या या वार्षिक उत्सवी उपक्रमाची रंगत, व्याप्ती आणि प्रतिसाद मोठ्या प्रमाणात वाढतच चालला आहे. आम्हाला खात्री आहे की आमचे अतिथी आमच्या ऑफरला पसंत करतील आणि आम्ही त्यांच्या उपस्थितीत २०१९ चे अभूतपूर्व आनंदासह स्वागत करू इच्छित आहोत.”
इमॅजिकाचे सरव्यवस्थापक मार्केटिंग – इव्हेंट्स ताबीश एफ खान म्हणाले, “रात्रीच्या राइड्सच्या संकल्पनेसाठी मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आमच्यासाठी अत्यंत समाधानकारक आहे. थीम पार्कमध्ये वेगळ्या धाटणीचे कार्यक्रम आणि रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या मैफिली हे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारार्ह प्रारूप आहे आणि भारतीय बाजारपेठेतही त्याची रुजूवात करीत असताना आम्हाला अतीव आनंद होत आहे. सध्या, कुटुंबांना बाहेर पडायला आणि नवीन वर्षाच्या संध्याकाळचा आनंद घेण्यासाठी अत्यंत मर्यादित ठिकाणे उपलब्ध आहेत. शिवाय इतकी मोठी जागा आहे आणि आमच्यासारखा विस्तृत व सुंदर परिसर मिळणे तर अवघडच. म्हणूनच दरवर्षी हजारो पाहुणे इमॅजिकाच्या साथीने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी उद्यानाला भेट देतात आणि आम्ही त्यांना वर्षभर लक्षात राहिल असा सर्वोत्तम अनुभव देण्याचा प्रयत्न करतो.”
रात्रीच्या मुक्कामाचा पर्याय आणि लज्जतदार खानपानाच्या सोयींमधून निवडीच्या संधीसह इमॅजिकामधील संगीतमय आणि उत्साहदायी नववर्ष स्वागताची रात्र ही निश्चितच चिरस्मरणीय ठरेल याची खात्री देता येईल.
अधिक माहिती व तिकीटांसाठी कृपया भेट द्या- https://www.adlabsimagica.com/
इमॅजिकाविषयी सारांशात…
पुणे आणि मुंबई शहरांदरम्यान स्थापित, इमॅजिका हे भारतातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे, ज्याद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क, मायकोनोस थीम असलेले वॉटर पार्क आणि भारतातील आजवरचे सर्वात मोठे स्नो पार्क हे सारे एकाच छताखाली अनन्य मनोरंजनाचा अनुभव प्रदान करतात. उद्यानाशी जोडलेले नोवोटेल इमॅजिका हे हॉटेल आहे, जे पाहुण्यांना आराम आणि निवासासाठी म्हणून वापरण्याचे सानुकूल पॅकेज प्रदान करते. इमॅजिका हे शालेय पिकनिक, कॉर्पोरेट भेटी-चर्चा आणि थीम वेडिंग, विवाहसोहळे, फोटोशूट आणि स्मरणीय उत्सवांसाठी आदर्श स्थान आहे. इमॅजिकासह, अडलॅब्स एंटरटेन्मेंट लिमिटेडने सर्व हंगामासाठी उपयुक्त मनोरंजक गंतव्यस्थान तयार केले आहे जे प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक कुटुंबासाठी एक अत्यावश्यक आणि हवाहवासा अनुभव प्रदान करते.