नवी मुंबई :- सारसोळे गावातील गावदेवी बेकरीजवळील सार्वजनिक शौचालयाजवळील मल:निस्सारण वाहिनी चोकअप झाल्यामुळे गेेल्या १५ दिवसापासून सांडपाणी रस्त्यावर येवून वाहत आहेे. स्थानिक ग्रामस्थांना व साडे बारा टक्के भुखंडावरील खासगी इमारतीमधील रहीवाशांना या सांडपाण्यातून ये-जा करावी लागत आहेे. त्या ठिकाणच्या रहीवाशांनी सारसोळेचे युवा ग्रामस्थ व महापालिका ब प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेेहेेर यांना सोमवारी सकाळी संपर्ककरून व्यथा मांडली. मनोज यांनी पालिका प्रशासनाशी संपर्क केेला असता, लवकरात लवकर ही समस्या सोडविण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिलेे.
सार्वजनिक शौचालयाच्या चारही बाजूने निवासी परिसर असून लोकांना या दुर्गधीचा सामना करावा लागत आहे. या शौचालयालगतच्या रस्त्यावर जेमतेम १५ ते २० दिवसापूर्वी मल:निस्सारण वाहिनी नव्यानेे टाकलेेली आहेे. पण शौचालयाच्या वाहिनीला ती जोडली नसल्यानेे चोकअप वाढून सांडपाणी रस्त्यावर आलेे आहे. गेल्या १५ दिवसापासून सांडपाण्याची दुर्गंधी सहज करत त्याच पाण्यातून ग्रामस्थांना व शेजारील रहीवाशांना ये-जा करावी लागत आहेे. तेथील रहीवाशांनी मनोज मेहेर यांना संपर्क करताच त्यांनी त्या ठिकाणी जावून समस्येची पाहणी केली. विशेष म्हणजेे शौचालयाच्या नामफलकावर सारसोळेऐवजी सरसोळे असा उल्लेेख असून बेकरीऐवजी बेरीजवळ असा उल्लेख आहेे.
मनोेज मेेहेेर यांना स्थानिकांंनी गेल्या १५ दिवसापासून हा त्रास आम्हाला सहन करावा लागत असल्याची नाराजी व्यक्त केली. नेरूळ पालिका विभाग अधिकारी तायडे व मल:निस्सारण अधिकारी शितोडे यांंना संपर्क करून १५ दिवसापासूून स्थानिक रहीवाशांना सहन कराव्या लागणार्या त्रासाची कल्पना दिली. तायडे व शितोडे यांंनी थोड्याच वेळात चोकअप काढण्याचे आश्वासन दिले.
मनोज मेेहेर यांंनी यावेळी उपस्थित रहीवाशांना तुम्ही करदाते नागरिक आहात. सुविधा मिळविण्याचा तुम्हाला अधिकार आहेे. काहीही समस्या असल्यास मला तात्काळ संपर्क करा असे सांगत आपले संपर्क नंबर त्यांना दिलेे. यावेळी स्थानिक महिलांनी दुपारच्या व रात्रीच्या वेळी घरात या दुर्गंधीच्या वासामुळे बसणे अवघड होत असल्याचे मनोज मेेहेर यांंना सांगितले. मनोज मेहेर यांनी स्थानिकासमोरच समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केेल्यामुळे त्यांनी मनोज मेेहेेर यांचे आभार मानलेे. त्यावर मनोज मेहेर यांनी आभार नका मानू, समस्या सांगत चला, घाणीत दिवस ढकलू नका, नाही पालिकेने कोणतेही नागरी काम केलेे तर तुमच्यासाठी मी महापालिकेसमोर उपोषणाला बसेल असे सांगत स्थानिकांना दिलासा दिला.