गणेश इंगवले
नवी मुंबई:- सध्याच्या धगाधगीच्या आणि वेगवान जीवनात ज्याचे शरीर सुदृढ आणि निरोगी तोच आनंदी माणूस आहे. वाढत्या महागाईमुळे खर्चिक जिम मध्ये प्रवेश घेणं मधमवर्गीयाना अशक्य बनले आहे. स्थानिक नगरसेविका ऍड स्वप्ना गावडे यांच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या ओपन जिमचा फायदा सिवूडस मधील जेष्ठांसह नागरिकांनी घ्यावा असा सल्ला नवी मुंबई मनपाचे माजी उपमहापौर , जेष्ठ नगरसेवक अशोकशेठ गावडे यांनी सिवूडस येथे बोलताना दिला .
नवी मुंबई मनपा प्रभाग क्र ८९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका ऍड स्वप्ना गावडे यांच्या प्रयत्नाने सिवूडस सेक्टर ४२ मधील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात ओपन जिम उभारण्यात आली आहे. या जिमच्या उदघाटन प्रसंगी माजी उपमहापौर अशोकशेठ गावडे बोलत होते. सिवूडस निवासी परिसरात बहुतांश मध्यमवर्गीय नागरिक राहत असून या ठिकाणीच्या नागरिकांची ओपन जिमची बऱ्याच वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली असल्याचे गावडे यांनी यावेळी बोलताना सांगितले. या ओपन जिमचा मुलांना तसेच विशेषतः जेष्ठ नागरिकांना मोठा लाभ होणार असल्याने याचा लाभ अधिकाधीक नागरिकांनी घ्यावा असे अशोकशेठ गावडे यांनी बोलताना सांगितले. . आपल्या घराच्या अगदी जवळ विना खर्चिक व वेळ न जाता व्यायामाची सोय झाली असल्याचे स्थानिक नागरिक राजेंद्र बोडके यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या ओपन जिमच्या उदघाटन प्रसंगी स्थानिक नगरसेविका ऍड स्वप्ना गावडे, के डी सावंत, ललित पाठक, अविनाश चव्हाण, दीपक शिंदे, दिलीप आंम्बरे ,सचिन शिंदे, नवनाथ इंगळे, मोहिते काका आदी मान्यवर उपस्थित होते.
—————————–
नवी मुंबईचे शिल्पकार माजी मंत्री गणेश नाईक यांच्या दूरदृष्टीने नवी मुंबई शहराचा विकास होत आहे. शहरात विविध व्हिजन यशस्वीपणे राबवत नागरिकांना उत्तम आणि दर्जेदार सेवा सुविधा प्राप्त होण्यासाठी नाईक साहेबांचे प्रयत्न सुरू असतात. माझ्या प्रभागातील नागरिकांना ओपन जिमची सेवा प्राप्त झाली असल्याचे मी आनंदी आहे.
ऍड स्वप्ना गावडे
नगरसेविका