पश्चिम महाराष्ट्र भूषण पुरस्कार देवून करण्यात आला सन्मान.
नवी मुंबई : मनसे व जनविकास प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने 11 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीत नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जुईनगर सेकटर 25 येथील महापालिकेच्या गणेश मैदान येथे पश्चिम महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या महोत्सवाला दर दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून अनेक नवनवीन पाहुणयांची उपस्थिती पहावयास मिळत आहे , त्यामुळे नवी मुंबईकर नागरिक सुद्धा या मोहत्सवाचा आनंद मनमुराद पणे घेत असल्याचे मत आयोजक गजानन काळे यांनी व्यक्त केले .
सोमवारी या मोहत्सवा मध्ये शिवव्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता , सदर प्रसंगी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यनगरी वृतपत्राचे संपादक संजय मलमे , मैक्स महाराष्ट्राचे रवींद्र आंबेकर , नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, मनसेचे ठाणे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव उपस्थित होते.
सदर प्रसंगी पश्चिम महाराष्ट्रातील नवी मुंबईतील पत्रकारांना पश्चिम महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविन्यात आले. पुरस्कारांचे मानकारी यांना सन्मान चिन्ह व तुळसीचे रोपटे देवून त्यांचा मराठमोळया पद्धतीने सन्मान करण्यात आला . विनायक पाटिल , सूर्यकांत गोडसे , योगेश शेट्ये , भरत कुमार कांबले , शरद वागदरे, संतोष जाधव , योगेश पिंगळे, आसिफ बागवान, शरद शिंदे , देवेंद्र कोल्हटकर या पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.
सदर प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणयांनी कार्यक्रमास शुभेच्छा देताना , आयोजित कार्यक्रमाचे कौतुक केले , व नागरिकांना देखील आव्हान केले की त्यांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा , असे प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविन्यात आले आहे.