श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : महापालिका प्रशासनात मूषक नियत्रंण विभागात काम करणार्या 50 कंत्राटी कामगारांचा आर्थिक वनवास संपण्याची आजही कोणती चिन्हे दिसत नाहीत. जानेवारी महिना अर्धा लोटला तरी मूषक नियत्रंणच्या कामगारांना अजून ऑक्टोेबर 2018चा पगार मिळालेेला नाही. राज्य व केंद्र दरबारी पुरस्कार मिळविणार्या व स्वमालकीचे मोरबे धरण असणार्या नवी मुंबई महापालिकेत मूषक नियत्रंणच्या कामगारांना राजकारणात, कामगार संघटनांत वाली नसल्याचे पालिका प्रशासन व ठेकेदार मिळून त्यांची पिळवणूक करत असल्याचा संंताप नवी मुंबईकरांंकडून व्यक्त केला जात आहेे.
मूषक नियत्रंण कामगारांना गेल्या अनेक वर्षापासून पगार नेहमीच तीन ते चार महिने विलंबानेच होेत आहेे. उंदिर मारण्यासाठी तसेच मेलेले उंदिर पकडण्यासाठी पालिका प्रशासनाकडून ग्लोव्हज, हात धुण्यासाठी औषधही दिले जात नसल्याने मूषकचे कामगार वरचेवर आजारी पडत असून त्यांना नजीकच्या काळात गंभीर आजार बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उंदिर पकडण्यासाठी काठी तसेच रात्री उंदिर शोधण्यासाठी लागणारी बॅटरीदेखील कामगारांना स्वत:च्या खर्चानेच विकत घ्यावी लागत आहेे.
मूषक नियत्रंण कामगारांचे वेतन नेहमीच विलंबाने होत असताना राजकारणी व कामगार संघटनांनी पालिका प्रशासनाला व ठेकेदाराला जाब विचारला नसल्याने प्रशासन व ठेकेदार मूषकच्या कामगारांचे आर्थिक शोषण करत आहे.
मूषक नियत्रंणच्या ठेकेदाराने कामगारांना नोव्हेंबरचा पगार देताना ऑक्टोबरचे बिल निघालेे नसल्याचे सांगितले आहेे. जानेवारी अर्धा लोटला तरी ऑक्टोबर व डिसेेंबर या दोन महिन्याचा पगार मूषक नियत्रंणच्या कामगारांना मिळालेेला नाही.