नवी मुंबई : महापालिका नेरूळ पश्चिम येथील सेक्टर 4 मधील विभाग कार्यालयासमोरीलच महापालिकेचे नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यानाला सकाळपासूून ते रात्री उशिरापर्यत अश्लिलतेचा विळखा पडल्याचे पहावयास मिळत आहेे. स्थानिक रहीवाशांनी याबाबत वेळोवेळी संताप व्यक्त करूनही पोलीस व महापालिका प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप स्थानिक रहीवाशांकडून करण्यात येेत आहेे.
स्थानिक रहीवाशांनी महापालिका ब प्रभाग समितीचे सदस्य मनोज यशवंत मेेहेर यांची भेट घेवून उद्यानाला अश्लिलतेच्या विळख्यातून मुक्त करण्याची मागणी केली. स्थानिकांसोबत मनोज मेेहेर यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उद्यानात फेरफटका मारला असता तीन कॉॅलेजवयीन मुले व तीन कॉलेजवयीन मुली उद्यानातील बाकड्यावर नको ते चाळे खुलेआमपणे करताना आढळूून आली. याबाबत मनोेज मेहेेर यांनी महापालिका विभाग अधिकारी तायडे यांच्याशी संपर्क करून वरील समस्येची कल्पना दिली व तायडेंना व्हॉटसअपवर फोटोही पाठवून मनोेज मेहेेर यांनी समस्येचे गांंभीर्य निदर्शनास आणून दिलेे. विभाग अधिकारी तायडे यांंनी संबंधित अधिकारी रोहेकर यांना निर्देश देतो, असे सांगितले.
स्थानिक रहीवाशांनी उद्यानात आपणास कधीही सुरक्षा रक्षक दिसला नसल्याचे सांगितले. उद्यानात सुरक्षा रक्षक दुपारी 3 ते 10 असतो असे यावेळी उद्यानात माळीकाम करणार्या कामगाराने सांग्गितलेे. तथापि स्थानिक मात्र सुरक्षा रक्षक असेल तर दुपारी ते रात्री उशिरापर्यत उद्यानात अश्लिल चाळे होतातच कसे, सुरक्षा रक्षक करतो तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला. उद्यानात कोणता अनुचित प्रकार घडल्यास अथवा व्याभिचार, अत्याचाराची घटना घडल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासनच जबाबदार राहील असा इशारा मनोज मेेहेेर यांनी यावेळी दिला.