अॅड .महेश जाधव
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील गोदावरी सोसायटीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गोदावरी सोसायटीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदाही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री सत्य नारायणाची पूजा, महिलांसाठी संगीत खुर्ची, लहान मुलांचे नृत्य, भोजन अशा विविध कार्यक्रमाचा समावेश होता. गोदावरी सोसायटी श्री. सत्य नारायण महापुजा दर्शनासाठी नवी मुंबई महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील, शिवसेनेचे उपविभागप्रमुख प्रल्हाद पाटील, स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख दिलीप आमले, उपशाखाप्रमुख इमरान नाईक, ज्येष्ठ शिवसैनिक शरद गोडवे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक वॉर्ड अध्यक्ष महादेव पवार, तुकाराम टाव्हरे यांच्यासह अन्य पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आले होते. सोसायटीचे अध्यक्ष शांताराम ठिकेकर, सचिव सुभाष शिंगोटे यांच्यासह सोसायटीतील अन्य रहीवाशांनी व युवकांनी हे सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.