नवी मुंबई : कॉंग्रेस पक्षाच्या नेरूळ-जुईनगर विभागाच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेला हळदीकुंकू समारंभ उत्साहात पार पडला. जुईनगर सेक्टर २५ येथील गणेश मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात स्थानिक परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात गौरी गणपतीचे खेळ, गाणी, फुगड्या, उखाणे या स्वरूपातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमात अनुराधा जोशी, ललिता सविते, वैशाली चव्हाण, संगीता बंगीरवार या चार महिला विविध खेळात विजेत्या ठरल्याने त्यांना पैठणी देवून सन्मानित करण्यात आले. याशिवाय ३० महिलांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. संध्या कोकाटे, गौरी रवींद्र सावंत, विद्या भांडेकर, भारती जाधव, शेवंता मोरे, मनोज पाटील, सुमित लंबे ,विजय कुरकुटे,महेश भोईटे, संग्राम इंगळे, शीतल सावंत ,रुद्दी मिस्त्री ,सुनीता शिंदे ,दांनवले यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. या कार्यक्रमाला कॉंग्रेसचे नेते संतोष शेट्टी, नवी मुंबईचे माजी उपमहापौर व नगरसेवक अविनाश लाड, माजी नगरसेविका अनिता शेट्टी, कॉंग्रेसच्या नवी मुंबई अध्यक्षा उज्ज्वला साळवे, कॉंग्रेसचे नवी मुंबई माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, नवी मुंबई इंटकचे अध्यक्षा रवींद्र सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता वायकर यांनी केले. या कार्यक्रमात कॉंग्रेस शक्तीची नोंदणीही करण्यात आली.