सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केटमधील व्यापार्यांची गृहनिर्माण सोसायटी म्हणून ओळखल्या जाणार्या नेरूळ सेक्टर 28 मधील श्रीगणेश सोसायटीमध्ये माघी गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून त्यानिमित्त आयोजित केेलेेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज संगीत कथा कार्यक्रमास भाविकांची दररोज सांंयकाळी मोठ्या संख्येने गर्दी जमत आहेे.
या सोहळ्याचे गणेश पूजन मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, नवी मुंबईचे माजी उपमहापौर व नगरसेवक अशोक गावडे यांच्या हस्ते 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता कलश पूजन झाले असून 8 फेब्रुवारीपर्यत श्री छत्रपती शिवाजी महाराज संगीत कथा हा कार्यक्रम चालणार आहेे. 8 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता काल्याचे किर्तन संपल्यावर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेे आहे. त्याचदिवशी दुपारी 3 ते 5 दरम्यान श्री. सत्य नारायणाची महापूजा व सांयकाळी 5 ते 7 हळदी कुुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहेे. दुपारी 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यत दर्शनासाठी येणार्या भाविकांसाठी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेे आहेे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दादर भाजीपाला व्यापारी मंडळ पुरस्कृत श्री गणेश सहकारी गृहनिर्माण संस्था, श्री गणेश सांस्कृतिक क्रिडा मंडळ, श्री गणेश प्रासादिक भजनी मंडळ आदी संस्था परिश्रम करत आहेेत. या कार्यक्रमात नवी मुंबईतील भाविकांंनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन नगरसेवक अशोक गावडे व नगरसेविका सौ. अॅड . सपना गावडे – गायकवाड यांनी केलेे आहे.