सुजित शिंदे : 9619197444
नवी मुबई : स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेरुळ पश्चिम तालुकाध्यक्ष गणेश भगत यांच्या वाढदिवसानिमित्त श्री गणेश कला,क्रीडा,व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने श्री गणेश चषक-२०१९ प्रकाशझोतातील अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.नेरुळ सेक्टर १६ येथील श्री गणेश मैदानावर दिनांक ३ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान प्रकाशझोतात झालेल्या क्रिकेट सामान्यांमध्ये नेरुळ परिसरातील सेक्टर-१६,१६ए ,१८,१८ए,२०नेरुळ गाव,२४,२८ मधील एकूण ४० संघानी सहभाग घेतला.
स्पर्धेचा शुभारंभ कै. बाळासाहेब काकडे आणि कै.शैलेश कडाळे यांना श्रद्धांजली वाहून शांतीचा संदेश म्हणून आकाशात कबुतरे सोडून करण्यात आला. स्पर्धेत सहभागी ४० संघाना मोफत प्रेवश देण्यात आला व ३२० खेळाडूंना मोफत टी-शर्ट देखील देण्यात आले. सामन्याच्या सांगताप्रसंगी स्पर्धेत प्रमुख ५ पारितोषिके,प्रत्येक सामन्यात सामनावीर,मालिकावीर,उत्कृष्ट,फलंदाज,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक,उत्कृष्ट फलंदाज अशी अन्य पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेत महालक्ष्मी-८ सेक्टर-१६ संघाने सामन्याची अंतिम बाजी मारून विजेतेपद पटकावले,द्वितीय श्रीमंतयोगी प्रतिष्ठान सेक्टर-१६ए संघ,तृतीय पाटील-८ नेरुळगाव,चतुर्थ अष्टविनायक-८सेक्टर १६,सह्याद्री-८सेक्टर-१८ पाचवे पारितोषिक पटकावले. या वेळी विजेत्या संघास ५५५५ रुपये व आकर्षक चषक,द्वितीय संघास ३३३३ रुपये व चषक,तृतीय संघास २२२२ रुपये व चषक,चतुर्थ संघास ११११ व चषक,पाचव्या संघास ५५५ रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. संपूर्ण स्पर्धेत मालिकावीर अजय नवले, उत्कृष्ट फलंदाज सिद्धेश कडू, उत्कृष्ट गोलंदाज निलेश वनकर,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कुणाल येडके यांची निवड झाली.
तसेच क्रिकेट सामन्यासाठी सहकार्य करणारे समाजसेवक शांताराम कुऱ्हाडे, संजय पाथरे, उत्तम मुसळे आणि सामन्यांचे अतिशय सुंदर असे समालोचन करणारे राकेश तांडेल, रोहित भोपी यांचा पुष्पगुछ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विकास तिकोने, सागर मोहिते, सूर्या पात्रा, रोहन म्हापणकर, रोहित चव्हाण, मन्सूर कोतवडेकर, मृणाल तांडेल, नारायण भोपी, विनायक सैद, सुभाष यादव, गणेश काटकर, राजेश घाडी, अमर मोरे, विशाल पाटील, प्रवीण म्हात्रे, विजय पिंगळे, संजय गांडाल, श्रीधर मोरे, गणेश नागरगोजे, मयूर पवार, संतोष नागरगोजे, संजय घाडी, संतोष पावसकर यांनी विशेष मेहनत घेतली.
स्थानिक तरुणांसाठी चांगली स्पर्धा आयोजित केल्याबाद्दल सहभागी संघानी तालुकाध्यक्ष श्री.गणेशदादा भगत आणि स्थानिक नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांचे आभार मानले. पारितोषिक वितरण प्रसंगी -तालुकाध्यक्ष श्री. गणेशदादा भगत,समाजसेवक अरुण पाटील साहेब ,पी.एस.आय गवळी साहेब संजय पाथरे,शांताराम कुऱ्हाडे,आनंदराव पवार,गोरक्षनाथ गांडाल,विरंद्र रत्ने,शिवाजी पिंगळे,अनंत कदम,भरत ठाकूर,उत्तम मुसळे विठ्ठल भोईटे,विकास औटी,सुरेश ठाकूर,समाधान कांबळे उपस्थित होते