राजेंद्र पाटील
पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलमधील शिक्षकवृंद, कर्मचारी नवीन खोलीचे उदघाटन अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते व संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. ०९) झाले.
शिक्षणाबरोबरच अत्याधुनिक आणि व्यवसायाभिमुख शिक्षण देणारे रायगड, नवी मुंबई परिसरातील अग्रगण्य प्रतिथयश शैक्षणिक केंद्र म्हणून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था ओळखली जाते. समाजातील सर्व क्षेत्रांच्या उन्नतीसाठी आवश्यक असणारे दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी हि संस्था सदैव प्रयत्नशील असते. त्या अनुषंगाने शिक्षक वर्ग आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलमधील चौथ्या व पाचव्या मजल्यासाठी संयुक्त अशी नवीन शिक्षकवृंद, कर्मचारी खोली उभारण्यात आली आहे.
यावेळी सीकेटी नवीन पनवेल विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, रामशेठ ठाकूर सिनिअर कॉलेजचे उप प्राध्यापक शरद कुमार शहा, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या प्राचार्या राज अलोनी, आणि शिक्षक वर्ग, कर्मचारी उपस्थित होते.