स्वयंम न्यूज ब्युरो
नवी मुंबई – नवी मुंबईतील जुईनगर प्रभाग क्रमांक ८३ मधील रुपेश किसन गायकवाड यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले.समाजसेवेचे व्रत रुपेश गायकवाड यांनी असेच सुरु ठेवावे आपले आशिर्वाद सदेव त्यांच्या पाठीशी आहेत असे उद्गार लोकनेते गणेश नाईक यांनी समाजसेवक रुपेश किसन गायकवाड यांना शुभेच्छा देताना काढले .
महिलांसाठी हळदी कुंकू आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे यावेळी करण्यात आले होते .यावेळी महिलांना विशेष भेट म्हणून चांदीचा करंडा तसेच पैठणी देण्यात आली. यावेळी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, सभागृह नेते रवींद्र इथापे,जिल्हा अध्यक्ष महिला सेना माधुरीताई सुतार ,जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी बाळासाहेब महाले,नगरसेविका तनुजा मढवी,ड प्रभाग समिती सदस्य सुनील कुरकुटे, ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे, तालुका अध्यक्ष गणेश भगत,ए पी एम सी मार्केट संचालक अशोक वाळूंज, समाजसेवक संजय पाथरे,
समाजसेवक दिनेश बांगर, नवी मुंबई रिटेल केमिस्ट अध्यक्ष राकेश हाडवळे,विजय ताम्हाणे यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त हजेरी लावली.