स्वयंम न्यूज ब्युरो
नवी मुंबई : सिवूड्स भागात शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘खासदार चषक’ उत्साहात पार पडला. या स्पर्धेत १२ संघ सहभागी झाले होते.
ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख विशाल विचारे यांनी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन विभागातील जेष्ठ नागरिक नामदेव खामकर (बाबा) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व प्रमुख शिवसेना पदाधिकारी आणि युवा फाऊंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. या स्पर्धेत अंतिम विजेता संघ प्रियदर्शनी संघ आणि उपविजेता बाबू स्मृती संघ ठरले. पारितोषिक वितरण समारंभकरिता शिवसेना उपनेते विजय नाहटा व ठाणे महानगरपालिकाच्या नगरसेविका सौ. नंदिनी राजन विचारे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख विजय माने व शिवसेना शहर पदाधिकारी व युवा सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.