शहिद निनाद मांडवगणे हे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सिन्नर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. त्यामुळे निनादच्या हौतात्म्याने प्रवरा परिवारातही शोककळा पसरल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी सांगितले. मांडवगणे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरी देशसेवेसाठी त्यांच्या पत्नीने लष्करात जाण्याची दाखविलेली तयारी अभिमानस्पद असल्याचे ते पुढे म्हणाले.
या कुटुंबाच्या पाठीशी संपूर्ण देश खंबीरपणे उभा आहेच. या दुःखातून सावरण्यासाठी शासन त्यांना नियमानुसार मदत करेलच. सोबतच प्रवरा परिवार देखील मांडवगणे कुटुंबाच्या पाठीशी सदैव उभा असेल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. याप्रसंगी सर विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डाॅ. रेड्डी, काँग्रेस नेते शैलेश कुटे आदी मंडळी उपस्थित होती.