स्वयंम न्युज ब्युरो
नवी मुंबई : सारसोळेच्या खाडीमध्ये महाशिवरात्रीच्या दिनी सारसोळेच्या ग्रामस्थांनी कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेला बामणदेवाचा भंडारा उत्साहात पार पडला. २० हजाराहून अधिक भाविक या भंडाऱ्यात बामणदेवाच्या दर्शनासाठी सहभागी झाले होते. सकाळी ९ वाजल्यापासून रात्री १०१५ वाजेपर्यत भाविकांची वर्दळ बामणदेवाच्या दर्शनासाठी सारसोळेच्या खाडीअंर्तगत भागात पहावयास मिळाली.
ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदा म्हात्रे, ऐरोलीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संदीप नाईक, शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, भाजप नेते वैभव नाईक, मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, महापालिका सभागृहनेते रवींद्र इथापे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, शिवसेनेचे नवी मुंबई शहरप्रमुख विजय माने, कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत, भाजप नवी मुंबई सरचिटणिस विजय घाटे, पर्यावरणप्रेमी सुकुमार किल्लेदार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरुळ तालुकाध्यक्ष गणेश भगत, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, उपाध्यक्ष सुनील सुतार, भाजपच्या युवती महिला जिल्हाध्यक्षा सौ. सुहासिनी नायडू, महिला व बालकल्याण सभापती सौ. सुजाता पाटील, दै. लोकदृष्टीचे व्यवस्थापक पत्रकार महादेव देशमुख, शिवसेना उपशहरप्रमुख गणपत शेलार, माजी सिडको संचालक व शिवसेना नगरसेवक नामदेव भगत, नगरसेवक काशिनाथ पवार, गिरीश म्हात्रे, रंगनाथ औटी, विशाल ससाणे, ब प्रभाग समिती अध्यक्षा कविता आंगोडे, नगरसेविका रूपाली भगत, जयश्री ठाकूर, नेरूळ ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे, माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे, मनसेचे शहर उपाध्यक्ष संदीप गलुगडे, शिवसेना विभागप्रमुख व महापालिकेतील शिवसेनेचे माजी पक्षप्रतोद रतन नामदेव मांडवे, शिवसेना उपविभागप्रमुख प्रल्हाद पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे बेलापुर अध्यक्ष व देवा ग्रुपचे अध्यक्ष देवनाथ म्हात्रे, मनसेचे विभागप्रमुख व कामगार नेते अभिजित देसाई, भाजप तालुका पदाधिकारी अर्जुन चव्हाण, मनविसेचे संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, शिवसेना शाखाप्रमुख दिलीप आमले, मनोज तांडेल, विशाल विचारे, राजेश पुजारी, राष्ट्रवादीचे वॉर्ड अध्यक्ष महादेव पवार, तुकाराम टाव्हरे, भाजपचे वॉर्ड अध्यक्ष अमर पाटील विलास चव्हाण, प्रदीप बुरकुल, समाजसेवक बाबूशेठ म्हात्रे, विरेंद्र लगाडे, रवींद्र भगत, एकनाथ ठाकूर, मकरंद म्हात्रे, गणेश पालवे, शरद पाजंरी, वाघमारे, गौतम शिरवाळे, यांच्यासह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भंडाऱ्यात दर्शन दरबार, नेरूळ सेक्टर १० सह विविध भजनी मंडळाकडून मधुर भजने सादर करण्यात आली.
बामणदेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांकरिता सकाळी ११ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यत भंडाऱ्यात प्रसादाची सोय करण्यात आली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारसोळेच्या ग्रामस्थांनी व कोलवाणी माता मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.