नवी मुंबई : नेरूळ पश्चिम नोडमधील सामाजिक कार्यकर्ते प्रकाशशेठ गायकवाड यांची नेरूळ तालुका कॉंग्रेस उपाध्यक्षपदी व नवी मुंबई इंटकच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नेरूळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या हस्ते त्यांना आज नियुक्तीपत्र सादर करण्यात आले.
प्रकाशशेठ गायकवाड यांचा सामाजिक, शैक्षणिक व राजकीय माध्यमातून नेरूळ पश्चिमला चांगला जनसंपर्क आहे. जुन्नर, आंबेगाव, नगर,नाशिक, सातारा, पुण्यातील अन्य भागातील नवी मुंबईतील रहीवाशांशी प्रकाश गायकवाड चांगला जनसंपर्क आहे. शिवसेनेच्या विचारधारेशी गेली अनेक वर्षे बांधिलकी असणारे प्रकाश गायकवाड गेली काही महिने राजकारणापासून अलिप्त असले तरी आपल्या भागातील लोकांशी व्यक्तीगत जनसंपर्क, कार्यक्रमांना उपस्थिती यामुळे गायकवाड पश्चिम महाराष्ट्रातील जनसामान्यात आजही परिचित असून त्यांना मानणारा आज एक वर्ग मोठ्या संख्येने नेरूळ पश्चिमला आहे. गायकवाड यांना नियुक्तीपत्र देताना नेरूळ तालुका कॉंग्रेसचे पदाधिकारी गणेश पालवेही उपस्थित होते.
गायकवाड यांच्यामुळे नेरूळ पश्चिम नोडमध्ये चांगला जनाधार मिळण्यास मदत होणार असून नेरूळ पश्चिमला महापालिका निवडणूकीत कॉंग्रेसला एक मातब्बर उमेदवार मिळाला असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू झाली आहे.