स्वयंम न्युज ब्युरो
नवी मुंबई : कुकशेत गावात सोमवार, दि. ३ जून रोजी आयोजित करण्यात आलेली श्री. शनी महाराजांची महापुजा उत्साहात पार पडली. श्री शनी जयंतीनिमित्त कुकशेत गावात नेरूळ सेक्टर १४ येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयासमोर श्री. शनी महाराजांची महापुजा, महाभिषेक व महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.
दुपारी १ ते ५ दरम्यान शनी महापुजा, महाअभिषेक व शनी महात्म्याचे पठण, सांयकाळी ५ ते ६ पूर्णाहूती महानैवैद्य, महाआरती, सांयकाळी ६ ते १० दर्शन व महाप्रसाद, सांयकाळी ७ ते १० भजन अशा विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात श्री. शनी दर्शनासाठी नवी मुंबईचे शिल्पकार असलेले लोकनेते गणेश नाईक यांच्यासह नवी मुंबईतील विविध पक्षाचे अनेक नगरसेवक, पालिकेतील विषय समिती सभापती, पक्षीय पदाधिकारी, सामजिक कार्यकर्ते, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, विविध गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी व नेरूळ नोडमधील रहीवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जय गजानन मित्र मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळ कुकशेत, महिला बचत गट व सुरज मित्र मंडळ यांच्या संयुक्त संयोजनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रात्री उशिरापर्यत चाललेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष, नगरसेवक व ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात कुकशेतचा ढाण्या वाघ अशी ओळख असणारे सुरज बाळाराम पाटील आणि वाणिज्य शाखेच्या द्विपदवीधर असलेल्या स्थानिक भागातील उच्चशिक्षित कार्यसम्राट नगरसेविका सौ.सुजाताताई सुरज पाटील, कुकशेतचे ग्रामस्थ व स्थानिक रहीवाशांनी या कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.