नवी मुंबई : पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नेरूळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महापालिका प्रभाग 96 मध्ये वृक्षारोपण मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नेरुळ सेक्टर-16 येथील छत्रपती संभाजी राजे उद्यानात मंगळवारी सकाळी वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी कार्यक्र्रमाचे आयोजक व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष गणेश भगत यांनी वसुंधरेच्या रक्षणासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्व उपस्थितांना पटवून दिलेे. यावेळी तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत, समाजसेवक आनंदराव पवार, शिवाजी पिंगळे, चंद्रकांत महाजन, भीमराव कांबळे,बाळा पाटील, भागोजी गाडगे, किसन मुळे, मंगेश कदम, रितेश मांदाडकर, मल्हार मानकुमरे,रविंद्र भगत उपस्थित होते.