लोकनेते गणेश नाईक यांच्या प्रेरणेने २००५ मध्ये सुरू झालेल्या ग्रीन होप या स्वयंसेवी संस्थेने वृक्षारोपण मोहिमांच्या माध्यमातून शहरात पर्यावरण संवर्धनाचे भरीव काम केले आहे. या संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने घणसोली तील सेक्टर ७ मध्ये वृक्षारोपणाची मोहीम आमदार संदीप नाईक यांच्या शुभहस्ते मंगळवारी पार पडली. याप्रसंगी पर्यावरण प्रेमी नागरिक, विद्यार्थी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भविष्यामध्ये नवी मुंबईत वाढणारे औद्योगीकरण आणि नागरीकरणामुळे शहराच्या प्रदूषणामध्ये अपेक्षित होणारी वाढ लक्षात घेऊन लोकनेते गणेश नाईक यांनी सुरुवातीला वृक्षप्रेमी संस्थेच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले. औद्योगिक परिसरात सध्या जी काही जुनी झाडे दिसतात ही झाडे वृक्षमित्र संस्थेच्या पर्यावरण संवर्धनाची साक्ष देतात. लोकनेते नाईक यांच्या प्रेरणेने २००५ मध्ये ग्रीन होप या संस्थेची स्थापना करण्यात आली., आमदार संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने संपूर्ण नवी मुंबई शहरात वृक्षारोपण मोहीम जोरकसपणे राबविली., गाव गावठाण नोड शैक्षणिक संस्था डोंगराळ भाग सोसायट्या रस्त्यांच्या बाजूंचा परिसर बाग-बगीचे झोपडपट्टी परिसर, अशा सर्वच ठिकाणी त्या भागात जगतील अशा वृक्ष रोपांचे रोपण केले., खाडीकिनारी शास्त्रशुद्ध पद्धतीने खारफुटीचे वृक्षारोपण करण्याचा पहिला प्रयोग या संस्थेच्या नावावरच जातो. केवळ वृक्षारोपण केले म्हणजे आपले कर्तव्य पार पाडले असे नसून लावलेले झाड हे जगवले पाहिजे, असे आवाहन आमदार नाईक यांनी केले. एका व्यक्तीने किमान दहा झाडे लावून तीच जगवावी. असे मत मांडले. झोपडपट्टी परिसरालगत डोंगराळ भागांमध्ये माजी महापौर तथा विद्यमान ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर सोनावणे यांनी रबाळे येथे यशस्वी केलेल्या वृक्षारोपण मोहिमेचा आमदार नाईक यांनी यावेळी गौरवपूर्ण उल्लेख केला.
वृक्षारोपण कार्यक्रमास नगरसेवक घनश्याम मढवी, नगरसेविका मोनिका पाटिल, नगरसेवक रमेश डोळे, प्रभाग समिति सदस्य प्रमोद जाधव, सुधीर थळे सर, कदम, डॉ. प्रतिक तांबे, मारुति सकपाळ, नवी मुम्बई सेवादल महिला अध्यक्षा आशाताई शेगदार, राजेश मढवी, संदीप चौधरी, निमिष झुंझारराव, प्रताप महाडिक सर, योगेश पाटिल, सुनिल म्हात्रे, अवतार बिंद्रा, संदीप गायकर, सतीष गायकवाड, दत्ता घोडके सर, अतुल घाडगे, शरद जगताप, घनसोली महिला अध्यक्षा मिनल मापणकर, राजू थोरात, रविंद्र शेलार, मधुकर गायकर, सागर घोडके, मनोज साहु, दत्ता वाशिवले, उत्तम सूर्यवंशी, दत्ता कदम, एफ जी नाईक कॉलेज च्या विद्यार्थी, शिक्षक आदि मान्यवर उपस्थित होते.
औद्योगिकरणामुळे नवी मुंबईत, प्रदूषण वाढले आहे. वायू आणि जल प्रदूषणात वृद्धी झाली आहे. त्यामुळे प्रदूषणकारी कंपन्या सुरू करण्यास परवानगी देऊ नये.,, ज्या कंपन्या सुरू आहेत त्या प्रदूषण करणार नाही यासाठी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा पाहिजे.
– संदीप नाईक, आमदार
तीन महिने सुरु राहणार वृक्षारोपण मोहीम
मोफत वृक्ष रोपांचे वाटप
ग्रीन होप संस्थेच्यावतीने पुढील तीन महिने सातत्याने वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या पर्यावरण प्रेमी व्यक्ती, सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे,, सोसायट्या, शैक्षणिक संस्था, कंपन्या इत्यादींना वृक्ष लागवडीसाठी वृक्ष रोपे ग्रीन होप संस्थेच्यावतीने विनामूल्य वितरीत केली जाणार आहेत. ९६९९८४२०२० येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.