स्वयंम न्युज ब्युरो
नवी मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वाशीमध्ये नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने गुरुवारी सकाळी वाशीमध्ये वृक्षारोपण व स्थानिक रहीवाशांना वृक्षारोपण करण्यासाठी वृक्षांची भेटही देण्यात आली. कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला.
सार्वजनिक उद्याने व इतरत्र नवी मुंबई कॉंग्रेसकडून सकाळपासून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उद्यानात उपस्थित असणाऱ्या तसेच इतर ठिकाणी भेटणाऱ्या रहीवाशांना वृक्षलागवडीचे व पर्यावरणाचे महत्व पटवून देताना कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी त्यांना वृक्षाची विविध रोपे भेट दिली. या कार्यक्रमात स्वत: अनिल कौशिक, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा सौ. सुदर्शना कौशिक, युवा नेते शार्दुल कौशिक, डॉ. प्राची शार्दुल कौशिक यांच्यासह चंद्रशेखर सिंग, देवीप्रसाद सक्सेरिया, संजीव शर्मा, सौ. रिटा सोमैय्या, ज्ञानदीप सिंग, गोपाल सिंग, गीतली नारुरकर, विजय पाटील, जसबिंदर भाटिया, सौ. कुषालीनी दास, किशोर पाटील, प्रकाश सुर्वे या अभियानात सहभागी झाले होते.
यावेळी अनिल कौशिक पर्यावरणाचा ढासळता ऱ्हास थांबविण्यासाठी व वसुंधरेचे रक्षणासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सध्याच्या काळात वृक्षारोपणाचे व वृक्षसंवर्धनाचे महत्व इतरांना पटवून दिले. वरूणराजाला पृथ्वीतलावर आणण्यासाठी आकर्षित करण्यासाठी या पृथ्वीचा कानाकोपरा वृक्षसंपदेने हिरवागार करण्यासाठी प्रत्येकाने परिश्रम करावे, असे आवाहन यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी यावेळी केले.