वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 5 जून रोजी
नवी मुंबई : ऐरोली येथील किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्रात शोभिवंत माशांचे उबवणी केंद्राचे उद्घाटन वनमंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 5 जून 2019 रोजी दुपारी 12 वाजता किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्र, दिवा जेट्टीजवळ, डी.ए.व्ही. शाळेसमोर, सेक्टर-10, ऐरोली, नवी मुंबई येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास खा. राजन विचारे, आ. संदिप नाईक, आ. रमेश पाटील, नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर जयवंत सुतार, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नितीन काकोडकर, वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. रामबाबू, कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एन.वासुदेवन, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी, राष्ट्रीय मत्स्य आनुवंशिक संसाधन ब्युरो लखनऊ डॉ.कुलदीप लाल आदि उपस्थित राहणार आहेत.
वन विभाग, कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मरीन मॅटर्स ही व्याख्यानमालिकेचे उद्घाटन, महाराष्ट्र वनविकास महामंडळाने कांदळवन प्रतिष्ठानला दिलेल्या 36 सिटर बसचा लोकार्पण सोहळा, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई यांनी तयार केलेल्या बर्ड बँन्ड मोबाईल प्लिकेशनचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते होईल. असे संयुक्त संचालक, उपवनसंरक्षक, कांदळवन कक्ष, मुंबई यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.