नवी मुंबई मनसेने पंतप्रधानांना दहा हजार पोस्ट कार्ड पाठविण्यास केली सुरुवात…!!
स्वयंम न्युज ब्युरो
नवी मुंबई : तमिळ सह संस्कृत,तेलगु,कन्नड,मल्याळम,ओडीआ या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्याचप्रमाणे मराठीने अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासंदर्भातील सर्व निकष पूर्ण करून आता साडेचार वर्ष उलटली आहेत. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या भाषा तज्ञांनी एकमताने मराठीच्या बाजूने शिफारस केलेली असतानाही केंद्र सरकार ही घोषणा करायला टाळाटाळ करीत आहे. त्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीबाबत दबाव वाढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई शहराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पासून १० हजार पोस्टकार्ड पाठविण्यास सुरुवात केलेली आहे. अशी माहिती नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिली आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा दाखला देत भारतीय जनता पक्षाने राजकीय प्रचारसभांमध्ये अनेकदा दिलेलाआहे. मात्र छत्रपती शिवरायांच्या मराठी भाषेकडे दुर्लक्ष करणारे केंद्र व राज्यसरकार अशा प्रकारे विरोधाभास करत मराठी भाषिक जनतेचे मन दुखावत असल्याचा आरोप मनसेचे उपशहर अध्यक्ष संदीप गलुगडे व नितीन चव्हाण यांनी केलेला आहे.
वाशी येथील पोस्ट ऑफिस कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १० हजार पोस्टकार्ड पाठविण्यास सुरुवात केलेली आहे सदर प्रसंगी मनसेच्या कार्यकर्ते यांनी “मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाच पाहिजे” ,”कोण म्हणतो देणार नाही घेतल्या शिवाय राहणार नाही”, “मराठी भाषा आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची” अशा घोषणांनी पोस्ट ऑफिस परिसर दणाणुन सोडला असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे शहर सचिव श्रीकांत माने व उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी कळवले आहे.
सदर प्रसंगी नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे,संदीप गलुगडे,नितीन चव्हाण,निलेश बाणखेले, श्रीकांत माने, दिनेश पाटील, डॉ.आरती धुमाळ, सविनय म्हात्रे, आप्पासाहेब कोठुळे, स्वप्नील गाडगे, अभिलेश दंडवते, विक्रांत मालुसरे, अभिजित देसाई, अमोल आयवळे, अमोल मापारी, उमेश गायकवाड, प्रेम जाधव,संदेश डोंगरे,सनप्रीत तुर्मेकर, नितीन नाईक, मयूर चव्हाण, अमित पाटील, महेश कदम, विराट शृंगारे,बाळकृष्ण जाधव, विशाल भिलारे, निखील थोरात, सखाराम सकपाळ,श्याम वाघमारे,सागर नाईकरे हे सर्वजण उपस्थित होते.