नवी मुंबई : पावसाळा सुरु असल्याने डासाच्या उद्रेकाची शक्यता लक्षात घेवून परिसरातील नागरिकांना साथीच्या आजाराची लागण होवू नये यासाठी नवी मुंबई भाजपच्या युवती जिल्हाध्यक्षा सौ. सुहासिनी नायडू यांनी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून नेरूळ सेक्टर 2 परिसरात धुरीकरण करून घेतले.
परिसरापासून खाडीकिनारा हाकेच्या अंतरावर आहे. त्यातच पावसाळ्यात डासांचा उद्रेक पाहता नवी मुंबईत ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आदी साथींच्या आजारांचा दरवर्षी पावसाळ्यात उद्रेक होतो. तसेच नेरूळ सेक्टर 2 परिसरात महापालिका प्रशासनाचे मल:शुध्दीकरण केंद्र आहेे. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करून स्थानिक रहीवाशांंना साथीच्या आजाराचा सामना करावा लागू नये यासाठी आपण पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत नेरूळ सेक्टर दोन परिसरात धुरीकरण मोहीम राबवून घेतली असल्याची माहिती सौ.सुहासिनी नायडू यांनी दिली.