नवी मुंबई : ऊर्जाचा कथानक हे द्धिधा मनस्थितीमधील असलेल्या मानसिकतेवर आधारित आहे. सेंट झेवियर्स हायस्कूल व ज्युनिअर काॅलेजने केलेल्या ऊर्जा या लघुपटास राज्यस्तरीय लघुपटास तृतीय पारितोषिक मिळाले. या लघुपटाची निर्मिती प्रार्चाया मनिषा आंधनसरे मॅडम, श्राबुनी बॅनर्जी, यांनी केली असुन दिग्दर्शक विलास चव्हाण सर यांनी केले आहे. लघुपटाचे कथा व संवाद लेखन रईसा कुरेशी मॅडम व १७ विद्यार्थीचा समावेश आहे.
विद्यार्थीमित्राना शुभेच्छा व प्रोत्साहन करण्यासाठी मैत्री ग्रुप नेरूळ नवी मुंबई यांच्यातर्फे निर्माता, दिग्दर्शक, लेखिकाना अभिनंदन पत्र सन्मानचिन्ह व तुळशीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. वृक्षरोपनाचा संदेश देत बदाम व इतर फळाची झाडे देण्यात आली. त्यावेळेस जाणता राजा तरूण मित्र मंडळाचे सचिव शाहूराज सोळसकर, मैत्री ग्रुप नेरूळ नवी मुंबई अघ्यक्ष अक्षय काळे, अभिषेक कलगुटकर, विवेक दुधळे क्रिएटिव्ह फाऊंडेशन चे संदिप निकम, इरशद इनामदार, स्वप्नील गरूड, किरण गोनके व इतर मित्रमंडळी उपस्थित होते.