नवी मुंबई : महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रात व साहित्यक्षेत्रात आपल्या संस्थेच्या माध्यमातून अल्पावधीत नावारूपाला आलेेलेे समाजसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेरूळ पश्चिममधील दिग्गज नेतृत्व असलेेले विरेंद्र (भाऊ) लगाडे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्र्रेसला ‘दे धक्का’ करत वंचित बहूजन आघाडीत प्रवेश केला आहेे.
7 जुलै रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन दादर येथे बहूज वंचित आघाडीचे नेतृत्व असलेले अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार कोळीवाडा गावठाण डठ- झोपडपट्टी जमीन हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक राजाराम पाटील हे म्हणाले की, शासनाने कोळीवाडा -गावठाण डठ- झोपडपट्टीधारकांना त्यांच्या मालकीचा जमीन हक्क किंवा त्यांच्या हक्काचे घर कार्ड हा पुरावा लवकरात लवकर देण्यात यावा. या कार्यक्रमाला भारिप बहुजन – वंचित बहुजन आघाडीचे कार्यालयीन सचिव रतन बनसोडे व रेखाताई ठाकूर हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. नवी मुंबईचे प्रसिद्ध समाजसेवक विरेंद्र (भाऊ) लगाडे यानी वंचित बहूजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला.
विधानसभा निवडणूका तोंडावर आलेेल्या असताना विरेंद्र लगाडेंचा वंचित बहूजन आघाडीत प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्व असलेल्या गणेश नाईकांना धक्का मानला जात आहेे. विरेंद्र लगाडे गेल्या दोन दशकापासून नेरूळमधील सामाजिक, सहकार व राजकीय क्षेत्रात कार्यरत असूून जनाधार असलेेला नेता अशी लगाडे यांची ओळख आहे. 2010 साली विरेंद्र लगाडे यांनी शिवसेनेतून महापालिका निवडणूक लढविली होती. शिवसेना शाखाप्रमुख, उपविभागप्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षे सक्षमपणे संघटनात्मक काम केलेे होते. 2015 साली महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक कार्यकत्यार्र्ंच्या दबावामुळे विरेंद्र लगाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रभाग 85 व 86 मधील दोन्ही जागा राष्ट्रवादीला विजयी करून देण्यात लगाडेंचे मोलाचे योगदान होेते. पतसंस्थेच्या माध्यमातून अनेकांना स्वंयरोजगार देणे, खासगी सावकारीला आळा घालणे अशी कामे करत सहकार क्षेत्रातही लगाडेंनी आपला ठसा उमटवला आहे. लोककला विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील नवख्या कलाकारांना प्रसिध्दीच्या झोतात आणलेे आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवित महाराष्ट्र स्तरावर लगाडे यांनी आपली ओळख निर्माण केेली आहेे. मागील विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेेते गणेश नाईकांना अवघ्या 1200 मतांनी पराभूत व्हावे लागलेे होते. विधानसभा निवडणूका अवघ्या 2 महिन्यावर आलेल्या असताना विरेंद्र लगाडेंसारखा मोहरा राष्ट्रवादीच्या छावणीतून वंचितमध्ये विलिन होणे राष्ट्रवादीसाठी धक्कादायक बाब मानली जात आहे.