• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 17, 2019

आ. मंदाताईं म्हात्रेंच्या हस्ते आमदार निधीमधून ओपन जिमचे लोकार्पण

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आ. मंदाताईं म्हात्रेंच्या हस्ते आमदार निधीमधून ओपन जिमचे लोकार्पण

सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई :आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य जपत नवी मुंबईतील नागरिकांनी आरोग्यासाठी थोडा वेळ व्यायामासाठी द्यावा, यासाठी बेलापूर विधानसभेच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून बेलापूर विधानसभा क्षेत्रातील नेरूळ सेक्टर- 8 येथील भाऊ साहेब शेरे उद्यानामध्ये ओपन जिमचे उदघाटन बेलापूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा विस्तारक वसंत सुतार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी भाजपा नेरूळ मंडळ अध्यक्ष राजू तिकोने सुहासिनी शिंदे, विनोद शहा, मुर्दुला शेट, अर्जुन चव्हाण, रमेश नरवडे, शशिकांत मोरे, अमर पाटील, कुणाल महाडिक, मकरंद म्हात्रे या भाजप पदाधिकार्‍यांसह शिवसेनेच्या महिला विभाग संघठक सौ. शलाका शरद पाजंरी तसेच असंख्य महिला व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, रोजच्या कुटुंबाच्या धावपळीत अनेक महिला तसेच ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे महिलांचे आरोग्य अधिक बिघडत चालले आहे. त्यात प्राणायाम, व्यायाम करण्याची इच्छा असतानाही घरापासून या सुविधा लांब असल्याने महिलांचे व ज्येष्ठ नागरिकांचे जाणे होत नाही. त्यामुळे घराच्या परिसरातच उद्यानामध्ये खुल्या व्यायामशाळांची (ओपन जिम) ची तेथील स्थानिक नागरिकांची मागणी होती. याच अनुषंगाने व्यायाम साहित्य उपलब्ध केल्यास त्याचा नागरिकांना उपयोग करता येईल या विचारातून बेलापूर विधानसभा क्षेत्रातील नेरूळ सेक्टर 8 येथील भाऊसाहेब शेरे उद्यानामध्ये आमदार निधीचा वापर करत ओपन जिमची निर्मिती केली आहे. व्यायामाचे अत्याधुनिक साहित्य बसविण्यात आले असून त्यामध्ये सायकलिंग, एअर वाकॅर्स, रोईंग, चेस्ट प्रेस आदी साहित्यांचा समावेश आहे. त्याच्या साहाय्याने सर्व प्रकारचा व्यायाम करणे आता शक्य होणार आहे. त्यामुळे सकाळी तसेच सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी उद्यानांमध्ये येणार्‍या ज्येष्ठ नागरिकांकरिता, महिलांसाठी खुल्या व्यायामशाळांकडे ओढ लागली असून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसोबतच तरुणाईही मोठया संख्येने दिसून येणार आहे. विशेष म्हणजे ताणतणाव, वाढलेले वजन यातून मुक्ती मिळण्यासाठी महिलाही खुल्या व्यायामशाळांकडे वळल्याचे चित्र पाहावयास मिळते. याकरिता नेरूळ पश्चिम क्षेत्रातील नागरिकांना ओपन जिम उपलब्ध केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. या परिसरातील सर्व नागरिकांनी उपक्रमाचे कौतुक करत रोज व्यायामशाळेत येण्याचा निर्धार व्यक्त केला असून परिसरातील स्थानिक ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांचा आनंद पाहून समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

नेरूळ विभागात प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक कारवाई

Next Post

उद्धव ठाकरेंकडून शेतकऱ्यांचा ‘नालायक’ म्हणून अवमान!

Next Post
लोकांच्या मनातील काँग्रेसचे झेंडे कसे काढणार?: खा. अशोक चव्हाण

उद्धव ठाकरेंकडून शेतकऱ्यांचा ‘नालायक’ म्हणून अवमान!

सानपाड्यात चालू बसचे चाक निखळले

सानपाड्यात चालू बसचे चाक निखळले

नगरसेविका सुशीला घरत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

नगरसेविका सुशीला घरत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com