स्वयंम न्यूज ब्युरो
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी मुंबईच्या जिल्हाध्यक्षपदी शरद पवारांचे निकटवर्तीय सहकारी अशोक गावडे यांची निवड झाली आहेे.
ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये काही दिवसापूर्वीच राजीनामा दिला. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक व पदाधिकारीही कोणत्याही क्षणी भाजपात जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव वाढविण्यासाठी पक्षाची धुरा जुन्या जाणत्या अशोक गावडे या समर्थकांवर शरद पवारांनी सोपविली आहे.
पक्षसंघटनेचा अनुभव अशोक गावडेंना असून सहकारातही त्यांच्या नावाचा व कार्याचा दबदबा आहे. बाजार समितीमध्ये पवार समर्थक असून नेरूळ, जुईनगर, कोपरखैराणे, घणसोली कॉलनी, ऐरोलीतील निवासी भागात पवार समर्थकांचा प्रभाव असूून त्याजोरावर राष्ट्रवादीची बांधणी करण्याचे कसब अशोक गावडेंना दाखवावे लागणार आहे.