स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
पर्यावरणप्रेमी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांचा पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसर व सारसोळे गाव प्लास्टिक मुक्त करण्याची महापालिका विभाग अधिकारी संजय तायडे यांच्या लेखी निवेदनातूून केली आहे.
महापालिका प्रशासनाकडून प्लास्टिक पिशव्यांच्या विरोधात उघडलेली मोहीम व केलेली दंडात्मक कारवाई तसेच जप्त केलेला माल याबाबत नेहमीच वर्तमानपत्रात वाचावयास मिळते. त्याबाबत सर्वप्रथम संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाचे निवेदनात अभिनंदन केले आहे.
आपल्या निवेदनात संदीप खांडगेपाटील यांनी पुढे असे म्हटलेे आहेे की, आपल्या कारवाईतून आमच्या नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गाव परिसराला वगळले असावे, असेच एकंदरीत चित्र आहे. आमच्या परिसरात खुलेआमपणे किराणा मालाच्या दुकानांमध्ये, पदपथावरील फेरी विक्रेत्यांकडे प्लास्टिक पिशव्यातून सामानाची पॅकिग करून ग्राहकांना दिले जात आहे. त्यामुळे सरकार राबवित असलेल्या प्लास्टिक विरोधी धोरणाची कठोरपणे अंमलबजावणी किमान आमच्या निवासी परिसरात होणे आवश्यक आहे. येत्या 15 दिवसाच्या आत आमचा नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गाव परिसर प्लास्टिक पिशवी मुक्त करण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.