सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ नोडमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रभाग ९६ मधील नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी प्रभागातील विविध समस्या सोडविण्याचे पालिका प्रशासनाला लेखी निवेदनातून साकडे घातले आहे.
पावसामुळे प्रभागातील पदपथ व उद्यानातील मॉर्निग वॉकची वाट निसरडी झाली असून त्यावर ठिकठिकाणी शेवाळही पसरले आहे. त्यामुळे या ठिकाणाहून जाणाऱ्या महिला, मुले, रहीवाशी, ज्येष्ठ नागरिक घसरून त्यांना गंभीर इजा होण्याची भीती व्यक्त करताना या ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकून सफाई करण्याची मागणी नगरसेविका रूपाली किसमत भगत यांनी केली आहे.
गणेशोत्सव आता अवघ्या २६ दिवसावर आलेला असल्याने प्रभागातील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील खड्डे व खाचखळगे तात्काळ बुजवून डागडूजी करण्याची मागणी करताना विघ्नहर्त्या गणरायाचे खड्यातून आगमन करायचे असा प्रश्नही नगरसेविका रूपाली किसमत भगत यांनी पालिका प्रशासनाला विचारला आहे.
प्रभागातील धोकादायक वृक्षछाटणी व अनेक ठिकाणच्या फांद्या छाटणी करण्याबाबत पावसाळा सुरू होण्यापूर्वी व पावसाळा सुरू झाल्यावर महापालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा करूनही प्रशासनाने चालढकल केली. दोनच दिवसापूर्वी झाडांच्या फांद्या पडून वाहनांचे नुकसान झाले. त्यास जबाबदार महापालिका प्रशासनच असल्याचा आरोप नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी केला आहे.