स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे विकासपर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संदीप नाईकांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. पक्ष व राजकारणाच्या पलिकडे मैत्री जोपासणाऱ्या व तळागाळातील वर्गाशी सातत्याने समरस होवून जनसेवा करणाऱ्या संदीप नाईकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी क्रिस्टल हाऊस ओंलाडलेला जनसागर ही नवी मुंबईकरांची संदीप नाईकांवर असलेल्या प्रेमाची व हक्काची पोचपावती देवून गेला.
संदीप नाईक हे विधानसभा सभागृहात दोन वेळा आमदार म्हणून कार्यरत असले तरी नवी मुंबई कार्यक्षेत्रात तळागाळातील बहूजन समाजामध्ये समरस होणारे व गोरगरीबांच्या समस्यांना प्राधान्याने सोडविणारे संदीप नाईक हीच त्यांची प्रतिमा आहे. आज संदीप नाईकांना शुभेच्छा देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेतील नगरसेवक, पक्षीय पदाधिकारी, अन्य पक्षातले पदाधिकारी, सामाजिक व शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातील घटक मोठ्या संख्येने आले होते. पर्यावरणप्रेमी संदीप नाईकांनी आवाहन केल्यानुसार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांनी लहान रोपटीच भेट म्हणून आणल्याने क्रिस्टल हाऊसचा परिसर हरितमय झाला होता. पर्यावरणप्रेमीचा वाढदिवस पर्यावरणाच्याच साक्षीने साजरा झाला असल्याची प्रतिक्रिया जनसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत होती. विविध वर्तमानपत्रांचे व यूट्यूब तसेच वृत्तवाहिन्यांचे पत्रकार व संपादकही संदीप नाईकांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
विशेष म्हणजे शुभेच्छा देणाऱ्या गर्दीवर नजर टाकली असता गोरगरीब, बहूजन वर्गाचे, तळागाळातील घटकांचा अधिक भरणा होता. या तळागाळातील संदीप नाईकांप्रती असलेली आत्मियता या सोहळ्याच्या निमित्ताने प्रकर्षाने पहावयास मिळाली. नवी मुंबईतील गोरगरीब जनतेशी संदीप नाईकांशी जुळलेली नाळ पाहता या समाजाला संदीप नाईकांप्रती कौंटूबिक आत्मियता पावलापावलावर पहावयास मिळाली. नेरूळगावच्या देवनाथ म्हात्रे या युवकाने आणलेले मोठे वडाचे झाड सर्वाचेच लक्ष वेधून घेत होते. रात्री बारा वाजल्यापासूनच संदीप नाईकांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा फोन खणाणत होता. संदीप नाईकांचा वाढदिवस दिवसभरात उत्साहात साजरा झाला असला तरी हा कोणा आमदाराचा नाही तर सर्वसामान्य जनतेच्या हक्काच्या माणसाचा वाढदिवस असल्याचेच चित्र निर्माण झाले होते.