सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : हाजी शाहनवाज खान यांची एमआयएम विद्यार्थी विभागाच्या कोकण विभाग निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली. एमआयएम महाराष्ट्र विद्यार्थी विभागाचे प्रदेश अध्यक्ष डॉ कुणाल खरात यांनी खारघर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खान यांची नियुक्ती जाहीर केली .
महाराष्ट्रामध्ये एमआयएम विद्यार्थी विभाग (संघटना) मोठ्या सक्रीयतेने कार्यरत असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही काम करणार असल्याचे कुणाल खरात यांनी यावेळी सांगितले. राज्यामध्ये शिक्षणाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती गंभीर आहे, खाजगी शाळांमध्ये मोठी लयलूट सुरू आहे, कॉलेजचे अनेक प्रश्न आहेत, अशा अनेक प्रश्नावर महाराष्ट्रभर एमआयएमचा विद्यार्थी विभाग (संघटना) काम करत असल्याचे खरात म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यार्थी विभागामधील काही सक्षम उमेदवारांना संधी द्यावी, अशी मागणी एमआयएमचे महाराष्ट्र अध्यक्ष तथा खासदार इम्तिहाज जलील यांच्याकडे केली असल्याचे देखील खरात म्हणाले.
यावेळी पनवेल उप जिल्हा रुग्णालयाबाबत शाहनवाज खान यांनी प्रश्न उपस्थित केला. सदर जमीन ही वक्फची, देवस्थानची असून याबाबत न्यायालयात याचिका दाखल आहे. असे असताना शासनाने येथे हॉस्पिटल कसे बांधले, असा प्रश्न खान यांनी उपस्थित केला.
यावेळी विद्यार्थी आघाडीचे रवीश मोमीन, रूमान रझवी, लतिफ शेख, सलीम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.