नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व भाजपचे मातब्बर नेतृत्व असणाऱ्या गणेश नाईकांच्या वाढदिवसानिमित्त महापालिकेच्या सारसोळे व कुकशेत गावातील दोन महापालिका शाळेतील मुलांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले. नगरसेवक सुरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका महिला व बालकल्याण समिती सभापती सा. सुजाता सुरज पाटील व नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी विद्यार्थांना नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे दिल्या जात असलेल्या विविध सुविधा शिष्यवृत्ती,शालेय गणवेश, पुस्तके तसेच पोषक आहार अशा अनेक गोष्टींचा उल्लेख करत गणेश नाईक यांचे नगरसेवक सुरज पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील, नगरसेविका सौं जयश्री एकनाथ ठाकुर व कुकशेत गावचे ग्रामस्थ, सारसोळे गावचे ग्रामस्थ तसेच सेक्टर ६ मधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.