नवी मुंबई : नेरूळ तालुका काँग्रेसच्या वतीने समाजप्रबोधन व जगजागृतीसाठी आयोजित चर्चासत्र शिबिर उत्साहात पार पडले. या चर्चासत्रात नेरूळ परिसरातील रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होेते.
नेरूळ पूर्वेला डीवायपाटील रूग्णालयाच्या बाजूलाच असलेल्या बंगाली असोसिएशन हॉलमध्ये नेरूळ तालुका काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष रवींद्र सावंत, तालुका महिलाध्यक्ष डॉ. नूरजॅहा तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्त्या सौ. निला लिमये यांनी आयोजन करण्यात पुढाकार घेतला होता.
काँग्रेसचे नवी मुंबई अध्यक्ष अनिल कौशिक यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले, तर कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव संतोष शेट्टी, नवी मुंबई महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा उज्जवला साळवी, काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका सौ. मिरा पाटील, नवी मुंबई महापालिका परिवहन सदस्य धालेवाड, नवी मुंबई काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष एस. कुमार, नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव विद्या भांंडेकर, सानपाडा-जुईनगर तालुकाध्यक्ष सौ. संध्या कोकाटे उपस्थित होत्या.
या चर्चासत्रात सुरेश सावंत यांनी धार्मिक व जातीय तणाव, ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर यांनी आर्थिक घडामोडी व बेरोजगारी, मनिषा पारपियानी व संगीता मालशे यांनी माहिती अधिकार व कायद्यातील तरतूदी या विषयावर चर्चासत्रात मार्गदर्शन केेले.
कार्यक्रमाचे आयोजन रवींद्र सावंत यांनी प्रास्तविकपर भाषण करताना कार्यक्रम आयोजनामागील पार्श्वभूमी विषद करताना सध्या समाजाला प्रबोधनाची व विधायक मार्गदर्शनाची गरज असल्याचे सांगितले. या चर्चासत्रात कामगार, औद्योगिक विश्व, कंपन्या व कारखान्याची प्रगती-अधोगती, देशातील जातीय तणाव यावरही चर्चासत्रात प्रबोधन करण्यात आलेे.
या चर्चासत्रात अनिल कौशिक, संतोष शेट्टी, लिना निमये आदींनी समयोचित विषयानुरूप भाषण करताना उपस्थितांना मार्गदर्शन केलेे. आयोजक व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाविषयी आयोजकांकडून व्यापक जनजागृती करण्यात आल्याने या चर्चासत्रात नेरूळ नोडमधील रहीवाशी मोठ्या संख्येनेे सहभागी झाले होते.
या कार्यक्रम आयोजनासाठी आर.के.नायर, महेश घाटे, मनिष महापुरे, सुमित लंबे, सनी डोळस, नेरूळ तालुका काँग्रेस उपाध्यक्ष प्रल्हाद गायकवाड, संतोष पाटील, संग्राम इंगळे, दिनेश गवळी आदींनी परिश्रम केलेे.