सुजित शिंदे : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील राजमाता जिजाऊ उद्यानात संगीत यंत्रणा बसविण्याची मागणी महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य व सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
महापालिका प्रभाग ८६ मध्ये राजमाता जिजाऊ हे एकमेव उद्यान आहे. या उद्यानात सकाळी व संध्याकाळी नेरूळ सेक्टर सहाचे रहीवाशी व सारसोळे गावचे ग्रामस्थ येत असतात. सकाळी मॉर्निग वॉकसाठी व संध्याकाळी विसावा घेण्यासाठी ग्रामस्थ व रहीवाशी उद्यानात पहावयास मिळतात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा व महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. नेरूळ सेक्टर ८ मधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानात महापालिका प्रशासनाने नुकतीच संगीत यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. त्याप्रमाणे याही उद्यानात संगीत यंत्रणा कार्यान्वत केल्यास लोकांच्या कानावर सकाळी ३ तास व संध्याकाळी ३ तास भावगीते कानावर पडतील. त्यांचे मन प्रसन्न राहील, थकवा गायब होईल. स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्यासाठी महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर उद्यानात संगीत यंत्रणा बसविण्याची मागणी मनोज मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
या मागणीसाठी मनोज मेहेर यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, महापौर जयवंत सुतार, नेरूळ विभाग अधिकारी संजय तायडे आणि महापालिका विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे.