सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ऑक्टोबर महिना संपत आला तरी महापालिकेत काम करणाऱ्या मूषक नियत्रंण विभागात काम करणाऱ्या कामगारांचा अद्यापि सप्टेंबर महिन्याचा पगार अजून झालेला नाही. याबाबत पालिका प्रशासन व ठेकेदार कोणतेही समाधानकारक उत्तर देत नाही. त्यामुळे २३ तारीख आली, पगार देणार तरी कधी असा संताप मूषक नियत्रंण विभागाच्या कामगारांकडून उघडपणे व्यक्त केला जात आहे.
महापालिकेच्या मूषक नियत्रंण विभागात जवळपास ७५ कंत्राटी कामगार काम करत आहेत. या कामगारांच्या वेतनविलंबाची गेल्या अनेक महिन्यापासून बोंब कायम आहे. पालिका प्रशासन व ठेकेदार तसेच नगरसेवक मूषक नियत्रंण कामगारांच्या विलंबाने होणाऱ्या पगाराबाबत काहीही करत नसल्याने मूषक नियत्रंणच्या कामगारांची आर्थिक ससेहोलपट होत आहे. त्यांच्या वेतनवाढीतील फरकही ठेकेदारांकडून अद्यापि मिळालेला नाही. ठेकेदाराच्या नावात मनी असले तरी कामगारांना त्यांच्या पगाराचा ‘मनी’ वेळेवर देण्यास ठेकेदार नेहमीच टाळाटाळ करत असतो. वेतन विलंबाबाबत ठेकेदार मूषक नियत्रंणच्या कामगारांना समाधानकारक उत्तर देण्याचेही सौजन्य दाखवित नाहीत.