उद्यानात येणाऱ्या नागरिकांना आता दिवसभरात ६ तास भावगीते ऐकावयास मिळू लागली
नवी मुंबई : शिवसेनेच्या प्रभाग ८७ मधील नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रभागातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानात संगीत यंत्रणा महापालिका प्रशासनाने कार्यान्वित झाली आहे. आता सकाळी व सांयकाळी उद्यानात फिरावयास येणाऱ्या स्थानिक तसेच सभोवतालच्या परिसरातील नागरिकांना भावगीते व अन्य गीते ऐकावयास मिळू लागल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जावू लागले आहे.
प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या तसेच शिवसेना उपशहरप्रमुख गणेश घाग यांच्या हस्ते या संगीत यंत्रणेचे लोर्कापण करण्यात आले. या कार्यक्रमास शिवसेना विभागप्रमुख कृष्णा धुमाळ, विभागप्रमुख रतन नामदेव मांडवे, स्थानिक नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे, महिला विभाग संघठक सौ. रेश्मा वेर्गुलेकर, उपविभागप्रमुख संतोष थोरात, शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी, युवा सेनेचे बेलापुर उपशहर अधिकारी निखिल रतन मांडवे, सौ. जयश्री बेळे, उपशाखाप्रमुख अनुभव बेळे, मंगेश शिवतरकर, शरद पाजंरी, प्रकाश कारभार, गौतम शिरवाळे, सुरेश मोरे, नामदेव दळवी, किसन कुंभारकर, बाबाजी चांदे, नामदेव सस्ते, शंकर परब, दिपक कानडे व विभागिय महिला सौ. अक्षदा कांदळकर, सौ. कविता कुलकर्णी, सौ. तांडेल यांच्यासह स्थानिक रहीवाशी, शिवसैनिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे यांनी प्रास्तविकपर भाषण करताना प्रभागातील विकासकामांची माहिती दिली. या संगीत यंत्रणेसाठी महापालिकेकडे तब्बल साडे नऊ वर्षे पाठपुरावा केला असल्याचे सांगत पालिका प्रशासनाकडून येत्या काळात करावयाच्या कामाविषयी पाठपुरावा असल्याबाबत माहिती विषद केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलासाठी गेली ८ वर्षे पालिका प्रशासनदरबारी आवाज उठवित असून नुकताच पादचारी पुलाच्या डागडूजीसाठीचा व पुर्नबांधणीचा ठरावही महासभेत मंजूर करून घेतला असल्याची माहिती रतन मांडवे यांनी यावेळी उपस्थितांना दिली.
स्थानिक नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी उद्यानात खेळणी,ओपन जीम, गजोबो, सेल्फी पॉईट आदी कामे लवकरच होणार असून आपण यापूर्वीही आमच्यावर जे प्रेम दाखविले, ते यापुढील काळातही कायम ठेवा असे भावनिक आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. उपशहरप्रमुख गणेश घाग यांनी मांडवे परिवार हा समाजसेवेला समर्पित झालेला परिवार असून काम पूर्ण झाल्याशिवाय मांडवे परिवार पाठपुरावा कायम ठेवत असल्याचे सांगितले. विभागप्रमुख कृष्णा धुमाळ यांनी आपल्या भाषणातून मांडवेंच्या कार्याचा आढावा घेतला. उद्यानात येणाऱ्या नागरिकांना सकाळी ५ ते ८ व सांयकाळी ५ ते ८ भावगीते आता ऐकावयास मिळत आहे. रतन मांडवे यांनी कार्यक्रमामधील उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.