राजेंद्र पाटील : ९९६७२८५६१८ : navimumbailive.com@gmail.com
उरण : आमच ठरलंय आता उरणात परिवर्तन होणारच असा निर्धार पदाधिकारी कार्यकर्ते यांनी व्यक्त केल्याने विरोधक हतबल झाले आहेत. त्यामुळे विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी येणाऱ्या देशाच्या पंतप्रधानांना काळे झेंडे दाखविणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना आज निवडणूकीत युती आठवते,आणि बेंकेच्या माध्यमातून ४०० कोटींचा भष्ट्राचार करु पाहणारे माजी आमदार विवेक पाटील हे काँग्रेसच्या कुबड्यांचा आधार घेऊन निवडणुकीला सामोरे जात असले, तरी उरणच्या उत्कर्षासाठी घासून नाय ठासून विजयी होणार आणि आमच्या शिटीचा आवाज हा येथील कार्यकर्ता दिल्ली पर्यंत पोहचणार आहे. कारण आज जरी आमची निशाणी शिटी असली तरी आमच्या हृदयात कमळाचे स्थान अबाधित आहे, असा आत्मविश्वास महेश बालदी यांनी व्यक्त केला.
उरण विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार महेश बालदी यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी उरण शहर, नवघर जिल्हा परिषद मतदार संघात मोटारसायकल रॅलीचे आयोजन ( सोमवार दि. १४) केले होते. या रँलीत तरुण, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या रँलीची सांगता जसखार गावातील श्री रत्नेश्वरी देवीच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या जाहिर सभेत करण्यात आली.यावेळी फुंडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रशांत भोईर, जसखार चे लिलाधर भगत, सोनारी गावचे शिवसेनेचे जेष्ठ पदाधिकारी जगन्नाथ कडू,अजय कुमार, डॉ अनिल बोस तसेच जसखार,सावरखार,पिरकोण,सोनारी सह इतर गावातील शिवसेना,शेकाप, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यानी भाजपात माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
या सभेला संबोधित करताना महेश बालदी यांनी पुढे सांगितले की २०१४ च्या निवडणूकीत मी पराभूत होऊन ही येथील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी केंद्र,राज्य आणि जेएनपीटी बंदराच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्या विकास कामांचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तिर्थरुप आप्पासाहेब धर्माधिकारी,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्रीगण यांच्या हस्ते आणि आमचे मार्गदर्शक लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत केले. हे माझ्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून जनतेला सांगत असताना येथील आमदार विकास कामांवर न बोलता मी मारवाडी म्हणून मला हिनवत माझी जात पात काढत आहेत. ते योग्य नाही.आज या आमदारांना साधा ग्रामसेवक ही घाबरत नाही. त्यामुळे ते रेल्वे संदर्भात व इतर कामासंदर्भात काय बैठक बोलवण्यात आणि उद्या मी तोंड उघडले तर त्यांना पळता भुई थोडी होईल,परंतू आपल्याला घाणीच राजकारण करायच नाही.आपल्याला विकासाच राजकारण करायच आहे.आणि ती शिकवण आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,तिर्थरूप आप्पासाहेब धर्माधिकारी आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कडून शिकलो आहे.तरी कार्यकर्त्यानी सुडाच राजकारण न करता मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्या विकासाच्या दृष्टीने आपली पावले उचलावीत कारण आपली नाळ ही या मातीशी,जनतेशी जुळलेली आहे त्यामुळे अब की बार एक लाख पार असा नारा उपस्थिताना शेवटी महेश बालदी यांनी देताच कार्यकर्त्यांनी एक शिटीचा आवाज दुमदुमून सोडला.
विकासाची संकल्पना डोक्यात ठेवणारा नेता म्हणजे महेश बालदी,त्याची जात पात काढत शिवसेनेचे आमदार राजकारण करीत असतील तर ती शिवसेना हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची नाही सत्तेसाठी लाचार असणाऱ्यांची आहे.आज मी तिनं वेळा आमदार झालो त्यावेळी आणि आज ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हृदयात जपत निस्वार्थी पणाने जनहिताची कामे करत आहे.माझे उर्वरित जनहिताचे कार्य या परिसराचा आमदार म्हणून महेश बालदी हे करणार असले तरी त्याच्या रूपात मीच व माझा सर्व सामान्य कार्यकर्त्या आमदार म्हणून कार्यरत राहणार आहे.असा विश्वास माजी आमदार देवेंद्र साटम यांनी व्यक्त करुन महेश बालदीच्या शिटीचा आवाज दिल्ली पर्यंत पोहचवा असा नारा कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी भाजपचे नेते पी.जे.पाटील, भाजपचे उरण उपाध्यक्ष पंडित घरत,प्रशांत पाटील,राजा पडते,संजय गायकवाड यांनी आपल्या घनाघाती भाषणातून विरोधकांचा समाचार घेतला.आणि महेश बालदी यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष सुधिर घरत,तालूकाध्यक्ष रविशेठ भोईर, नगराध्यक्षा सौ सायली म्हात्रे, युवा नेते तथा महालण विभागाचे अध्यक्ष महेश कडू, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, जितेंद्र घरत, दिनेश तांडेल,तालूका चिटणीस निळकंठ घरत,सूनिल पाटील,युवा मोर्चाचे अध्यक्ष शेखर तांडेल, शहराध्यक्ष कौशिक शहा, सरपंच दामूशेठ घरत, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, सरपंच सौ पुनम महेश कडू, सरपंच सौ ज्योती परशुराम म्हात्रे,माजी सरपंच योगेश पाटील,रविशेठ वाजेकर,समिर मढवी,प्रकाश कांबळे,दिपकशेठ भोईर, सरपंच अमित मुंगाजी,माजी उपसभापती नित्यानंद भोईर, नगरसेवक राजेश ठाकूर,माजी सरपंच गौरव कोळी, हेमंत म्हात्रे, रमेश फोफेरकर, भाजपचे उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर,प्रकाश कडू,आजी माजी नगरसेवक, सरपंच सह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.